Sidhhu Vs Channi : नवज्योत सिद्धूंना मोठा धक्का बसणार; काॅंग्रेसकडून चन्नीच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार | पुढारी

Sidhhu Vs Channi : नवज्योत सिद्धूंना मोठा धक्का बसणार; काॅंग्रेसकडून चन्नीच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या पंजाबच्या राजकारणात प्रचाराचा वेग चांगलाच वाढला आहे. प्रत्येक पक्ष आपापला मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असणारा उमेदवार घोषीत करत आहेत. सामुहिक नेतृत्वात निवडणूक लढवावी, यांसदर्भात काॅंग्रेस अजून चर्चा करत आहेत. पण २०१७ सारखे काॅंग्रेसवर मुख्यमंत्री पदाचा उमेदवारी घोषीत करण्यासाठी दबाव वाढत आहे. (Sidhhu Vs Channi)

पंजाबच्या निवडणुकीत काॅंग्रेस मुख्य स्पर्धक आहे. आम आदमी पार्टीने लोकसभेचे खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषीत केलेले आहेत. २०१७ च्या निवडणुकीच्या अनुभवातून आपने हा निर्णय घेतला आहे. कारण, त्यांच्याकडे त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी कोणताच चेहरा नव्हता. पण, कॅप्टन अमरिंदर सिंहांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषीत केलेलं होतं. अशा परिस्थितीत काॅंग्रेस चरणजीत सिंह चन्ना यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषीत करण्याची शक्यता आहे.

पक्षाचे रणनितीकार असं म्हणताहेत की, सध्याच्या परिस्थितीत काॅंग्रेसचं पारडं भारी आहे. कारण, त्यांच्याकडे चन्नी यांच्यासारखा तगडा उमेदवार आहे. चन्नी स्वतःला मुख्यमंत्री म्हणून सुमारे १०० दिवसांच्या कार्यकालात स्वतःला सिद्ध केलेलं आहे. अशा काॅंग्रेस चन्नी यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषीत करून पंजाबमधील सत्ता पुन्हा हस्तगत करू शकते. पण, काॅंग्रेसमध्ये सिद्धू बंडखोरी करतील, अशीही शक्यता आहे. (Sidhhu Vs Channi)

काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार सिद्धू यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषीत करणार नाही. कारण, त्यात पक्षाचं सर्वात जास्त नुकसान आहे. त्याचबरोबरल सिद्धू पंजाबमधील जटसिख नेत्यांना मानत नाहीत. तर दुसरीकडे चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषीत केलं नाही तर त्याचा सरळ परिणाम दलित मतांवर होणार आहे. आणि दलितांचं मतदान सुमारे ३० टक्के इतकं आहे. चन्नी मुख्यमंत्री झाल्यानंतर या समाजात विश्वास निर्माण झालेला आहे.

चन्नीच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे संकेत काॅंग्रेसने ट्विट करून दिलेले आहेत. खरं तर काॅंग्रेसने अभिनेता सोनू सूदचा ३६ सेकंदांचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओनंतर अनौपचारिक आणि अप्रत्यक्षपणे चन्नी यांनाच काॅंग्रेसचा चेहरा म्हणून घोषीत केलेलं आहे. कारण, त्यामध्ये केवळ चन्नी यांचेच छायाचित्र आहे.

Back to top button