कपिल शर्मा या कॉमेडियनवर येतोय बायोपिक | पुढारी

कपिल शर्मा या कॉमेडियनवर येतोय बायोपिक

पुढारी ऑनलाईन

अभिनेता, विनेदवीर अशी ओळख असणाऱ्या कपिल शर्मा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्याला अमाप प्रसिध्दी तर मिळालीच आहे. शिवाय दिवसागणिक त्याची लोकप्रियता वाढत चाललीय. त्याने त्याच्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर इथवरपर्यंतचा प्रवास केला आहे. आता कपिल शर्मा याच्या जीवनावर बायोपिक येणार आहे. ‘Funkaar’ असे बायोपिकचे नाव असल्याची माहिती समोर आलीय.

त्याच्या आयुष्यावर चित्रपट येतोय. कपिलचे आयुष्य जाणण्यासाठी त्याचे फॅन्स उत्सुक आहेत. हा बायोपिक फुकरे चित्रपटाचे दिग्दर्शक मृगदीप सिंह लांबा दिग्दर्शित करतील. बायोपिकचं नाव असेल ‘फनकार’. या बायोपिकची निर्मिती महावीर जैन हे लायका प्रोडक्शस अंतर्गत करतील.

या बायोपिकमध्ये स्वत: कपिल भूमिका करेल की अन्य कलाकार, याबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, कपिलचा एक शो नेटफ्लिक्सवर लवकरच येणार असल्याची माहिती समजतेय.

कपिलने स्वत: कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ लॉन्च केलाय. यामध्ये दिग्गज आणि बॉलिवूड सेलिब्रिटी येतात. मजेशीर अंदाजात मुलाखत घेणे, हे त्याचे वैशिष्ट्य म्हणता येतील. तर कपिलचं नाव अनेकदा वादातही सापडले आहे. आता हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल की, त्याच्या बायोपिकमध्ये काय-काय पाहायला मिळणार आहे.

Back to top button