'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेचे १०० भाग पूर्ण - पुढारी

'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेचे १०० भाग पूर्ण

पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्ती संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. ज्ञानेश्वर ते ज्ञानेश्वर माऊली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतं आहे.

ज्ञानेश्वर माउलींवर पहिल्यांदाच मालिकेची निर्मिती झाली आणि नेहमीचं वेगळ्या धाटणीच्या आणि विषयाच्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणाऱ्या सोनी मराठी वाहिनीने तो विडा उचलला. दिगपाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर अशा दिगज्ज मंडळींकडून ही कलाकृती घडतेय. प्रेक्षकांची ही या मालिकेला खास पसंती मिळतेय.

या मालिकेतून ज्ञानेश्वर माऊलींची चरित्रगाथा उलगडत आहे. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचत आहे.

१७ जानेवारीला या मालिकेचे १०० भाग पूर्ण होत आहेत. मालिकेत पैठणच्या धर्मसभेतून शुद्धिपत्र मिळवून माऊली आणि भावंड आपल्या आजोळी म्हणजेच आपेगांवी पोहोचली आहेत. आपल्या दिव्यत्वाची प्रचिती देत माऊली आणि भावंडांची गोष्ट हळूहळू पुढे जात आहे. येत्या काही भागांमध्ये नरबळी आणि अंधश्रद्धा यांना माउलींनी कसा विरोध केला हे पाहायला मिळणार आहे.
पाहत राहा, ‘ज्ञानेश्वर माऊली’ सोम.-शनि., संध्या ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Back to top button