Kylie Jenner : कोण आहे ही अभिनेत्री जिचे Instagram वर ३० कोटी फॉलोअर्स | पुढारी

Kylie Jenner : कोण आहे ही अभिनेत्री जिचे Instagram वर ३० कोटी फॉलोअर्स

पुढारी ऑनलाईन डेस्क

अमेरिकन अभिनेत्री कायली जेनर (Kylie Jenner) हिने सोशल मीडियावर एक नवा विक्रम केला आहे. तिची खास गोष्ट म्हणजे २४ व्या वर्षी तिने अमाप लोकप्रियता मिळवली होती. अद्यापही तिची ही लोकप्रियता टिकून आहे. Kylie Jenner चे इन्स्टाग्रामवर ३०० मिलियन (३० कोटी) फॉलोअर्स झाले आहेत. हा आकडा पार करणारी ती पहिली महिला ठरलीय.

या नवीन रेकॉर्डसोबत Kylie Jenner ने इन्स्टाग्राम सर्वात जास्त फॉलो करणाऱ्यांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे. पहिल्या क्रमांकावर तिचे ऑफिशियल इन्स्टा अकाऊंट आहे. तिचे ४६० मिलियन फॉलोअर्स आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पुर्तगालचा फुटबॉलपटू Cristiano Ronaldo आहे. त्याचे ३८९ मिलियन फॉलोअर्स आहेत.

कायली जेनरनंतर फुटबॉलपटू Lionel Messi चा क्रमांक लागतो. त्याचे एकूण ३०० मिलियन फॉलोअर्स आहेत. पुढे अभिनेता Dwayne ‘The Rock’ Johnson (२८९ मिलियन फॉलोअर्स) याचा क्रमांक लागतो. कायली जेनरनंतर सर्वात अधिक फॉलोअर्स असलेल्या महिलांमध्ये पॉप सिंगर Ariana Grande हिचे नाव येते.

कायलीने काही दिवसांपूर्वीच एका मेकअप कॉस्मेटिकसाठी फोटोशूट केले. परंतु, तिचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले नव्हते. त्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले होते.

holly कायली जेनर सातत्याने चर्चेत असते. ती अनेकदा फोटोशूटमुळेही चर्चेत राहते. ती बोल्ड, न्यूड फोटोशूटवरून ती चर्चेत राहिली आहे. टीव्ही, बिझनेस आणि सोशल मीडियाच्या जगात प्रसिद्ध असलेली किम कार्दशियन ही त्याची मोठी बहीण आहे.

Back to top button