

पुढारी ऑनलाईन डेस्क
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना ( Smriti Mandhana ) यंदाची सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर ठरली आहे. २०२१ या सालात केलेल्या कामगिरीची दखल घेत आयसीसीने (ICC) तिला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर ( Icc Women's Cricketer Of The Year ) म्हणून गौरविले आहे.
स्मृती मानधनासह ( Smriti Mandhana ) या यादीत इंग्लडची खेळाडू टॅमी ब्युमोट, दक्षिण आफ्रिकेची लिजेली ली आणि आर्यलंडची गॅबी लुईस यांना देखिल आयसीसीने या पुरस्कारासाठी नामांकन दिले होते. पण, स्मृतीने या तिघींना पछाडत या पुरस्कारावर आपले नाव कोरले. स्मृती मानधनाला दुसऱ्यांदा या पुरस्कारने गौरविण्यात आले आहे. तिने २०१८ साली सुद्धा सर्वोत्कृष्ट क्रिकेटरचा पुरस्कार पटकावला होता.
स्मृती मानधनासाठी ( Smriti Mandhana ) २०२० हे साल अत्यंत कठीण राहिले होते. मागील वाईट काळाला विसररुन तिने कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने २०२१ सालात खोऱ्याने धावा केल्या. तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे. भारतामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत आठ सामन्यात भारताला फक्त दोनच सामन्यात विजय मिळवता आला होता. पण या दोन्ही विजयात स्मृती मानधना हिने मुख्य कामगिरी बजावली होती. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिने ८० धावांची खेळी केली होती. तर शेवटच्या टी २० सामन्यात तिने ४८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.
स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana ) मागील वर्षी एकूण २२ आंतरराष्ट्रीय सामने खेळली. यामध्ये तिने ३८.३६ च्या सरासरीने ८५५ धावा केल्या. या खेळीत एक शतक तर पाच अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लड विरुद्ध ड्रॉ झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात ती ७८ धावा केल्या होत्या. तसेच एकदिवसीय मालिकेत एकमेव विजय मिळवणाऱ्या भारताकडून स्मृतीने ४९ धावांची खेळी केली होती.
डे-नाईट कसोटी सामन्यात झळकावले शतक
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तिने ८६ धावा केल्या होत्या. तर दिवस रात्र खेळवल्या गेलेल्या एकमात्र कसोटी सामन्यात स्मृतीने शतक झळकावून सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. ती एकमात्र अशी विदेशी खेळाडू आहे जीने तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावले आहे. भारताकडून खेळताना एकदिवसीय सामना व कसोटी सामन्यात तिने ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावले आहे. तर ऑस्ट्रेलियातील बिग बॅश टी-२० स्पर्धेमध्ये तिचा सहभाग असतो. तेव्हा तीने बीग बॅश स्पर्धेतील टी २० सामन्यात तीने शतक झळकावले आहे.
आयसीसी अॅवॉर्ड 2021 ची संपूर्ण लिस्ट