

पुढारी आऑनलाईन डेस्क
साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका गाजवणारी श्रिया सरनच्या (shriya saran ) नावावर अनेक हटके चित्रपट आहेत. अजय देवगनसोबत दृश्यममध्ये काम करून तिने वाहव्वा मिळवली होती. तसेच दक्षिणेतही तिने अनेक चित्रपट केले आहेत. त्यापैकी जय भीम फेम अभिनेता सूर्यासोबतचा तिचा एक चित्रपट गाजला होता. आता श्रिया ही गोव्यात व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेलीय. तिच्या समुद्रातील हॉट अदा फोटोंच्या माध्यमातून पाहायला मिळताहेत. (shriya saran )
श्रिया गोव्यात गेली आहे. ती आपल्या फॅमिलीसोबत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. तिच्यासोबत एक चिमुकलाही दिसतो आहे. दोघेही समुद्रात आनंद घेताना दिसत आहेत. यावेळी श्रियाने पिंक कलरची बिकिनी घातलीय. ती या बिकिनीत हॉट दिसतेय. तिने काही फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. तसेच तिने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे.
समुद्राच्या लाटा, सोनेरी वाळू आणि खळखळणाऱ्या पाण्यात ती आणि चिमुकला एन्जॉय करताना दिसतात. ती पिंक कलरची बिकिनी घालून वाळूत झोपलेली एका फोटोमध्ये दिसते. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ती चिमुकल्याला घेऊन स्माईल देताना दिसते.
तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले श्रियाचे बिकिनी फोटोज आणि व्हिडिओला लाईक्स मिळत आहेत. तिच्या फोटोंवर सोशल मीडिया युजर्स कमेंट करत आहेत.