राज ठाकरे यांच्याविरुद्ध परळी न्यायालयाचे पुन्हा अजामीनपात्र वॉरंट | पुढारी

राज ठाकरे यांच्याविरुद्ध परळी न्यायालयाचे पुन्हा अजामीनपात्र वॉरंट

परळी ; पुढारी वृत्‍तसेवा : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात परळीच्या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश दिला आहे. जामीन घेतल्यानंतरही सतत कोर्टामध्ये गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

यापूर्वी 10 फेब्रुवारीला कोर्टाने अटक वॉरंट काढले होते आणि 13 एप्रिल पर्यंत कोर्टात हजर राहण्यासंदर्भात सांगितले होते, मात्र राज ठाकरे हे 13 एप्रिलपर्यंत कोर्टात हजर न झाल्याने पुन्हा दुसऱ्यांदा परळी कोर्टाने राज ठाकरे यांना अटक वॉरंट काढले आहे.

Back to top button