नाशिक : जिल्हा मजूर संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर | पुढारी

नाशिक : जिल्हा मजूर संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी निवडणुकीसाठी सभासद संस्थांचे ठराव मागवण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार दि. 2 ते 31 मेदरम्यान संस्थांकडून ठराव मागवण्यात आले आहेत. कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

संघाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया मार्च 2016 मध्ये पार पडली होती. त्यानुसार संचालक मंडळाची मुदत 16 मार्च 2021 रोजी संपुष्टात आली. मात्र, कोरोना संकट असल्या कारणाने सहकार प्राधिकरणाने संचालक मंडळाला ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपुष्टात आल्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली नव्हती. मात्र, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सहकारी संस्थांच्या संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. यात पहिला व दुसरा टप्पा पार पडला असून, तिसर्‍या टप्प्यातील प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सुरू केली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 27 (3) नुसार सभासद झाल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीनंतर संस्था मतदानास पात्र होत असल्याने 1 एप्रिल 2019 किंवा त्यापूर्वी सभासद झालेल्या संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव पाठवण्यात यावेत. संघाच्या सदस्य असलेल्या संस्था जर थकबाकीत असतील, तर अशा संस्थेच्या संचालकांऐवजी संस्थेच्या थकबाकीदार नसलेल्या एखाद्या सदस्याचा प्रतिनिधी म्हणून ठराव पाठविता येईल. संस्थेने ही सभा बोलाविण्यासाठी दिलेल्या नोटिसीची प्रत. नमुन्यात नसलेला ठराव, तसेच 31 मे 2022 नंतर प्राप्त झालेले ठराव ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button