Shravan Fasting : श्रावणात उपवास करताय? ‘या’ महत्वपूर्ण टिप्स तुमच्यासाठी…

Shravan Fasting : श्रावणात उपवास करताय? ‘या’ महत्वपूर्ण टिप्स तुमच्यासाठी…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'श्रावणमासी, हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे। क्षणात येती सरसर शिरवें क्षणात फिरुनी ऊन पडे।।' ते 'रिमझिम बरसत श्रावण आला, साजण नाही आला' या कवितांच्‍या ओळी कानी पडतच आपल्‍याला श्रावणाची चाहूल लागते. या महिन्‍यात महिलावर्गात उपवासाचे प्रमाण जास्त पाहायला मिळते. उपवास करण्याचा प्रत्येकाचा हेतू वेगवेगळा असतो. उपवास करताना योग्य ती पथ्ये पाळली तर  श्रावणातील उपवास मात्र तुम्हाला लाभदायक नक्कीच ठरेल. चला तर मग श्रावण महिन्यात उपवास करताना कोणती पथ्ये पाळावीत हे पाहूया.

 जेवढे शरीराला गरज तेवढेच खा

 पचनसंस्थेला आराम मिळावा म्हणून काही जण उपवास करतात; पण समोर चविष्ट, खमंग पदार्थ आले की, जीभेवर संयम राहत नाही. यावेळ अति खावू नका. थोडक्यात काय तर, उपवासादिवशी दुप्पट खावू नका. उपवासाचा मुख्य हेतु बाजूला राहताे. खाण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या शरीराल जेवढ्या अन्नाची गरज आहे तेवढचं खा. यामुळे पचनसंस्थेला आराम मिळेल.

Shravan Fasting :  यांनी उपवास टाळावा 

जे लोक आजारी आहेत, शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण खूप कमी आहे त्यांनी उपवास करणे टाळावे. कारण तुम्ही आजारी असता. एकतर तुम्हाला थकवा असतो आणि त्या स्थितीतही तुम्ही उपवास केला तर तुम्हाला अधिक थकवा जाणवेल आणि जास्तचं तुम्ही आजारी पडाल.

सकस आणि पौष्टीक खा

उपवास करताय? पण काय खाताय याकडे पण लक्ष असूदे. समोर उपवासाचे पदार्थ आहेत म्हणुन खात राहू नका. कारण जे पदार्थ तुमच्या शरीराल पोषक तत्वे देणार आहेत त्याच पदार्थांचा विचार तुम्ही खाण्यासाठी करावा. राजगिरा लाडू, भगर, अननस, पेरु यासारखी फळे. बदाम, खारीक सारखे पदार्थ खाण्यावर भर द्यावा. या पदार्थांमधून मानवी शरीराल पोषक तत्वे मिळतात. थोडक्यात, सकस आणि पौष्टीक आहार घ्या.

 वेळेवर खा : Shravan Fasting  

उपवासाच्या पदार्थामधील साबूदाना खिचडी, शेंगदाणे, शेंगदाणा लाडू यासारखे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. पण या पदार्थांच्या अतिसेवनाने शरीरातील आम्लप्रवृत्ती वाढते. जर का तुम्ही खूप वेळ उपाशी राहून हे पदार्थ जास्त खाल्ले तर आम्लप्रवृत्ती आणखी वाढु शकते. त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य तो आहार घ्या.

तर..खाण्याची पद्धत बदला

जर का उपवासाच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा जाणवतं असेल तर तुमच्या खाण्यात व त्या वेळांमध्ये बदल करण्याची गरज आहे हे लक्षात घ्यायला हवे. तुमच्या शरीराला जे पोषक आहे तेच पदार्थ तुमच्या आहारात येवुदेत. जेणेकरुन तुम्हाला उपवासानंतर थकवा जाणवणार नाही. थोडक्यात श्रावण तुम्हालाआरोग्यदायी घालवायचा असेल तर नक्की या टिप्स फॉलो करा. वरील टिप्स तुम्ही वापरात असणार तर आहारतज्ञांचा योग्य सल्ला घ्या.

श्रावण विशेष : हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news