Shehbaz Sharif : पाकिस्‍तान पंतप्रधानपदासाठी मित्र पक्षांकडून शाहबाज शरीफ यांच्‍या नावावर एकमत

Shehbaz Sharif : पाकिस्‍तान पंतप्रधानपदासाठी मित्र पक्षांकडून शाहबाज शरीफ यांच्‍या नावावर एकमत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इम्रान खान यांचे सरकार कोसळल्‍यानंतर पाकिस्‍तानमधील राजकीय हालचाली कमालीच्‍या वेगावल्‍या आहेत. उद्‍या ( दि.११) देशाचे नवे पंतप्रधान कोण होणार हे स्‍पष्‍ट होणार आहे. दरम्‍यान, पाकिस्‍तानमधील मीडिया रिपोर्ट्‍सनुसार, आज इम्रान खान यांच्‍या तेहरीक-ए-इन्‍साफ पक्षाच्‍या विराेधात एकवटलेल्‍या मित्र पक्षांनी  एकमताने पंतपधानपदासाठी पाकिस्‍तान मुस्‍लिम लीग-नवाजचे शाहबाज शरीफ ( Shehbaz Sharif ) यांना उमेदवारी दिली. शाहबाज हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बंधू आहेत. पाकिस्‍तान पीपल्‍स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्‍टो यांच्‍याकडे पाकिस्‍तानचे पराराष्‍ट्र मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्‍याची शक्‍यता आहे. दरम्‍यान इम्रान खान यांचा तेहरीक-ए-इन्‍साफ पक्षाने माजी परराष्‍ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांना उमेदवारी दिली आहे.

Shehbaz Sharif : शाहबाज यांनी मानले मित्रपक्षांचे आभार

एआरवाय न्‍यूजने दिलेल्‍या वृत्तानुसार, पाकिस्‍तानमध्‍ये  इम्रान खान यांच्‍या तेहरीक-ए-इन्‍साफ पक्षाच्‍या विराेधात एकवटलेल्‍या मित्र पक्षांनी एकत्रीतपणे पंतप्रधानपदाचे उमेवार म्‍हणून पाकिस्‍तान मुस्‍लिम लीग-नवाझ पक्षाचे शाहबाज शरीफ यांचे नाव सुवचले. यानंतर शाहबाज यांनी ट्‍विटरवरुन सर्व मित्रपक्षाच्‍या नेत्‍यांसह कार्यकर्त्यांचे आभार मानले.

शनिवारी रात्री उशिरा पाकिस्‍तान राष्‍ट्रीय संसदेत इम्रान खान सरकारविरोधातील अविश्‍वास प्रस्‍तावावर मतदान होण्‍यापूर्वी संसदेचे सभापती, उपसभापतींनी आपल्‍या पदाचा राजीनामा दिला. यानंतर रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी अविश्‍वास प्रस्‍तावावर मतदान झाले. इम्रान खान सरकारविरोधात १७४ मते पडली. त्‍यांचे सरकार सत्तेतून पायउतार झाले. आता सोमवार दि. ११ रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्‍यात आले आहे. यावेळी देशाच्‍या नव्‍या पंतप्रधानपदासाठी मतदान होणार आहे. शाहबाज शरीफ यांच्‍या पंतप्रधानपदी निवड झाल्‍याची औपचारिक घोषणा होणे बाकी असल्‍याचा दावा विरोधी पक्षाचे नेते करीत आहेत.

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ पाकिस्‍तानमध्‍ये परतणार

इम्रान खान सरकार कोसळल्‍यानंतर आता लवकरच माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे पाकिस्‍तानमध्‍ये परत येणार आहेत. मागील काही वर्ष त्‍यांचे वास्‍तव्‍य इंग्‍लंडमध्‍ये होते. मागील आठवड्यातच नवाझ शरीफ यांच्‍यावर लंडनमध्‍ये हल्‍ला करण्‍याचा प्रयत्‍न झाला होता. हा हल्‍ला इम्रान खान यांच्‍या समर्थकाने केल्‍याचा दावा त्‍यांनी केला होता.

हेही वाचा :

पाहा व्‍हिडीओ : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news