Disha Patani : डेव्हिड वॉर्नरने दिशा पटानीसोबत केला जबरदस्त डान्स, चाहते झाले थक्क ( व्‍हायरल व्‍हिडीओ )

David Warner Viral Video
David Warner Viral Video

पुढारी ऑनलाईन डेस्क : 
सध्या चर्चेतील गाण्यांवर आणि चित्रपटातील डायलॉगवर रील्स बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर असताेच . जगभरातील कंटेट रायटर आणि निर्माते अशा प्रकारचे व्हिडिओ आणि रील्स बनवताना दिसतात. यामध्ये भारतासह जगभरातील क्रिकेटपटूही मागे नाहीत.अलिकडेच अनेक क्रिकेटपटूंनी 'पुष्पा' चित्रपटातील डायलॉग्स आणि श्रीवल्ली या गाण्यावर अल्लू अर्जुनच्या स्टाइलमध्ये केलेला हटके डान्स व्हाटरल झाला होता. तर काही क्रिकेटर्स आपल्या सोशल मीडीयावर व्हिडिओ शेअर करताना दिसले. सध्या सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर हा बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

डेव्हिड वॉर्नर हा सलमान खानच्या 'राधे' चित्रपटातील 'व्हिसल मार' या हिट गाण्यावर थिरकताना दिसतोय. हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि यूजर्सही हा व्हिडीओ खूप बघत आहेत आणि लाईक्सही करत आहेत.

क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरवर बॉलीवूड तसेच टॉलीवूड गाण्यांवरही त्याच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना आकर्षित करत असतो. काही व्हिडीओमध्ये वॉर्नर त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबतही दिसत असतो. या व्हिडीओमध्ये मात्र वॉर्नर सलमान खानच्या 'व्हिसल मार' या हिट गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर आतापर्यंत २१ लाख ६० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

हेही वाचलंत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news