Jersey Movie : शाहीद कपूरला धक्का, जर्सी चित्रपट ऑनलाईन लिक

shahid kapoor jersey film leak online
shahid kapoor jersey film leak online
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

शाहीद कपूरचा चर्चित जर्सी चित्रपट ऑनलाईन लिक (Jersey Movie) झाला आहे. आरआरआर आणि साऊथ स्टार यशचा चित्रपट केजीएफ २ मुळे शाहिदने आपल्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली होती. जर्सी रिलीज झालाय. चित्रपटाने अपेनिंग डेला केवळ ५.५० ते ७ कोटींचा बिझनेस केला. आता हा चित्रपट शनिवारी ७ ते १० कोटींदरम्यान बिझनेस करू शकतो. आता वीकेंडला हा चित्रपट किती कलेक्शन करेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. दरम्यान, जर्सी हा चित्रपट ऑनलाईन लिक (Jersey Movie) झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे जर्सी चित्रपटाच्य़ा कमाईवरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

जर्सीमध्ये मृणाल ठाकूर आणि शाहीद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. RRR आणि KGF चॅप्टर २ नंतर शाहीदचा जर्सी चित्रपट रिलीज झाला. परंतु, आरआरआर आणि केजीएफ समोर शाहीदचा जर्सी खास कमाल दाखवू शकत नाही. कासवगतीने हा चित्रपट चालत आहे. चित्रपटाच्या कलेक्शनबाबतीत सुरुवात थंड राहिलीय. पहिल्या दिवशी या चित्रपटाची म्हणावी तशी जादू चालली नाही. हा चित्रपट २२ एप्रिलला रिलीज झालाय. एका बेकायदेशीर वेबसाईटवर आणि एका ॲपवर हा चित्रपट लिक झालाय.

जर्सी हा मूळचा चित्रपट तमिळ आहे. तमिळ चित्रपटाचे नावदेखील जर्सी असेच होते. याचाच रिमेक हिंदीमध्ये करण्यात आलाय. साऊथ अभिनेता नानी तमिळ चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. आता Goutam Tinnanuri यांचा हा स्पोट्र्स ड्रामा लिक झालाय.

याआधीही राधे, मुंबई सागा, रुही, केजीएफ चॅप्टर २, काश्मीर फाईल्स हे चित्रपटही ऑनलाईन लिक झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news