

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराला आकर्षक अशा पद्धतीने तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे मंदिर परिसर झगमगाटून गेला आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना निमित्ताने स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला वैद्यनाथ मंदिर परिसर तिरंगी रंगात न्हाऊन निघाला आहे. या विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला असून वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या माध्यमातूनही देशभक्तीचे स्फुपल्लिंग जागृत करण्यात येत आहे.