

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतार येथे झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत बुस्केट्सने (Sergio Busquets ) स्पेनचे नेतृत्व केले. पेनल्टी शूटआऊटमध्ये शॉट चुकलेल्या तीन स्पॅनिश खेळाडूंपैकी तो एक होता. फिफा विश्वचषक स्पर्धेत संघाच्या पराभवानंतर स्पेनचा कर्णधार सर्जिओ बुस्केट्सने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे.
एक दशकाहून अधिक काळ स्पेनच्या मिडफिल्डमध्ये खेळणाऱ्या बुस्केट्सचे उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतर मन दुखावले गेले. पेनल्टी शूटआऊटमध्ये मोरोक्कोचा पराभव करून स्पॅनिश संघ स्पर्धेतून बाहेर पडला. यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतरही बुस्केट्स क्लब फुटबॉल खेळणार आहे. (Sergio Busquets)
स्पेनच्या राष्ट्रीय संघाने शुक्रवारी सांगितले की, ३४ वर्षीय बुस्केट्सवने स्पेनकडून १४३ आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर निवृत्ती जाहीर केली आहे. बुस्केट्स २०१० विश्वचषक आणि २०१२ युरो कप विजेत्या संघांचा सदस्य होता. स्पेनसाठी सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. या बाबतीत तो सर्जिओ रामोस (१८० सामने) आणि इकर कॅसिलास (१६७ सामने) त्याच्या पुढे आहे.
हेही वाचा;