

पुढारी ऑनलाईन डेस्क: क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी एवढेच क्षेत्ररक्षणाला महत्त्व आहे. क्षेत्ररक्षणातील एक चूक सामना गमावयाला भाग पाडते. म्हणूनच 'कॅचेस विन मॅचेस' असा वाक्यप्रचारही रुढ झाला. ( Rishabh-Virat Catch ) भारत आणि बांगलादेशमधील पहिल्या कसोटी सामन्यातील असा एका कॅचचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
बांगलादेशच्या फलंदाजांनी दुसर्या डावाची सुरुवात दमदार केली. सलामीवीर शान्तो आणि झाकीर यांनी १०० धावांची भागीदारी करत संघाचा आत्मविश्वास वाढवला. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना एकही बळी घेता आला नाही; पण दुसऱ्या सत्रात उमेश यादवने आपल्या शानदार चेंडूवर शांतोला झेलबाद करून भारताला पहिली यश मिळवून दिले.
लंचनंतर खेळ सुरू झाला तेव्हा ४७व्या षटकातील पहिला चेंडू उमेश यादवने टाकला, नजमुल हुसेन शान्तोने मारलेला फटका स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कोहलीच्या हातात गेला; पण कोहली हातून चेंडू सुटला. चेंडू विराटच्या हातातून बाहेर पडला आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या दिशेने उसळला. चेंडू जमिनीवर पडण्यापूर्वीच डायव्हिंग करत पंतने अप्रतिम झेल टिपला. बांगालादेशला दमदार सुरुवात करुन देणार्या शान्तो बाद झाला. शांन्तो याने 156 चेंडूत 67 धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार फटकावले.
हेही वाचा :