Stock Market Closing Bell | तेजीचा माहौल! सेन्सेक्स ४८२ अंकांनी वाढून बंद, गुंतवणूकदारांवर १.९६ लाख कोटींचा पाऊस

Stock Market Closing Bell | तेजीचा माहौल! सेन्सेक्स ४८२ अंकांनी वाढून बंद, गुंतवणूकदारांवर १.९६ लाख कोटींचा पाऊस
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातून संमिश्र संकेत असतानाही मंगळवारी भारती शेअर बाजारात खरेदीचा माहौल पाहायला मिळाला. सेन्सेक्स ४८२ अंकांनी वाढून ७१,५५५ वर बंद झाला. तर निफ्टी १२७ अंकांच्या वाढीसह २१,७४३ वर स्थिरावला. बाजारातील आजच्या तेजीत बँकिंग स्टॉक्स आघाडीवर राहिले. (Stock Market Closing Bell)

बँकिंग शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला चांगला सपोर्ट मिळाला. या जोरावर बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १.९६ लाख कोटी रुपयांनी वाढले. १२ फेब्रुवारी रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३,७८,८४,८३७.१३ कोटी रुपये होते. ते आज १३ फेब्रुवारी रोजी ३,८०,८०,८६४.७० कोटी रुपयांवर पोहोचले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.९६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

पीएनबी, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक शेअर्समधील तेजीमुळे आजच्या ट्रेडिंग सत्रात बँक निफ्टी १.३ टक्क्यांनी वाढून ४५,५०२ वर पोहोचला. क्षेत्रीय पातळीवर बँक निफ्टी सर्वाधिक वाढला. निफ्टी हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅस यांनीही चांगली कामगिरी केली. पण निफ्टी मेटलने सुमारे २ टक्क्यांनी घसरला.

IRFC चा शेअर्स १७ टक्क्यांनी वाढला. तर Hindalco चे शेअर्स सुमारे १२ टक्क्यांनी घसरले.

सेन्सेक्सवर आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, विप्रो, कोटक बँक, एनटीपीसी, टेक महिंद्रा हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. इंडसइंड बँक, मारुती, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा हे शेअर्सही वाढले. तर अल्ट्राटेक सिमेंट, एम अँड एम, टायटन हे शेअर्स घसरले.

निफ्टीवर कोल इंडिया, यूपीएल, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लाईफ हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांदरम्यान वाढले. तर हिंदाल्को, ग्रासीम, डिव्हिस लॅब, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स घसरले.

बाजारातील तेजीचे कारण

देशांतर्गत महागाईत झालेली घट आणि MSCI ग्लोबल स्टँडर्ड (इमर्जिंग मार्केट्स) निर्देशांकात ५ भारतीय स्टॉक्सचा समावेश झाल्याने परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढेल, या आशेने आज बाजारात तेजी राहिली.

PSU शेअर्समध्ये तेजी

PSU शेअर्समध्ये सोमवारी घसरण झाली होती. पण या घसरणीच्या एका दिवसानंतर मंगळवारी रेल्वे, बँकिंग आणि संरक्षण क्षेत्रांसह सर्व विभागांमध्ये PSU शेअर्स १५ टक्क्यांपर्यंत वाढले. बीएसई पीएसयू निर्देशांक शेअर्समध्ये रेल्वेचे शेअर्स सर्वाधिक वाढले. IRFC, RVNL आणि Ircon International चे शेअर्स ८ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढले.

दरम्यान, पंजाब अँड सिंध बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक या पीएसयू बँक स्टॉक्समध्ये ४ ते ६ टक्क्यांदरम्यान वाढ झाली. बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) देखील सुमारे ३ टक्क्यांनी वाढले.

रिलायन्सचे मार्केट कॅप २० लाख कोटींवर

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये तेजी कायम राहिली. आज मंगळवारी बीएसईवर हा शेअर्स १ टक्क्यांहून अधिक वाढून २,९५७ रुपयांवर गेला. हा या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक होता. तर हा ​शेअर्स २०२४ मध्ये आतापर्यंत सुमारे १४ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज २० लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय सूचीबद्ध कंपनी बनली. रिलायन्स शेअर्सने बीएसईवर २,९५७ रुपयांचा नवीन विक्रमी उच्चांक गाठला. आज १३ फेब्रुवारी रोजी तो इंट्राडे १ टक्क्यांहून अधिक वाढला. त्यानंतर हा शेअर्स २,९३१ रुपयांवर स्थिरावला. (Reliance Industries Share Price)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news