

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेपाळमार्गे भारतात आलेली पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर प्रकरणाचे गूढ आता आणखी वाढले आहे. गुप्तचर विभाग आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) तिची तब्बल १८ तासांपैक्षा अधिक वेळ चौकशी केली आहे. सीमा प्रत्येक प्रश्नाचे अचूक आणि आत्मविश्वासाने उत्तर देत आहे. तिचा भारतात येण्यामागील हेतूबाबत सुरक्षा यंत्रणांनी संशय व्यक्त केला आहे. आता लवकरच तिची पॉलीग्राफसारखी मानसिक चाचण्या केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी तपास यंत्रणांना न्यायालयात परवानगी मागणार असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे. (Seema Haider and Sachin Meena)
गुंतागुंतीचे प्रश्न टाळण्यासाठी सीमा हैदर कधी रडते तर कधी हसते. तिचे वर्तन असामान्य असल्याचे तपास यंत्रणांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. चौशकीत तिने अत्यंत सराईपणे कोणत्याही प्रश्नावर नाराजी किंवा राग दाखवला नाही. तिने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. कोणत्याही प्रश्नावर तिने संयम गमावला नाही. त्यामुळेच तपास यंत्रणांचा संशय आणखी बळावला आहे. कारण तपास यंत्रणा जेव्हा चौकशी करतात तेव्हा व्यक्ती हा मानसिक दृष्ट्या खचतो. मात्र सीमा हैदर ही अत्यंत संयमाने सर्व परिस्थिती हाताळताना दिसते. विशेष म्हणजे तब्बल १८ तासांच्याचौकशीनंतर दोन दिवसांनी तिने माध्यमांना पुन्हा मुलाखती दिल्या.
सर्वोच्च न्यायालयाचे वकील एपी सिंह आणि सचिन मीणा यांचे वडील नेत्रपाल यांच्यासोबत शुक्रवारी राष्ट्रपती भवनात गेले. तेथे त्यांनी सीमाच्या वतीने दयेचा अर्ज दाखल केला. ते म्हणाले की, सीमा हैदरने तिचा पहिला पती गुलाम हैदरपासून घटस्फोट घेतला आहे. तिने सचिन मीनासोबत प्रेमविवाह केला आहे. तिला भारतीय संस्कृती आवडते. तिला आता पाकिस्तानला पाठवते पाठवल्यास तेथे त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. काही शंका असल्यास, यंत्रणांनी तपास करावा. एजन्सींना हवे असल्यास ते पॉलीग्राफ आणि ब्रेन मॅपिंगसारख्या चाचण्याही करू शकतात. सचिनची पत्नी म्हणून सीमा यांना नागरिकत्व देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
पोलीस बंदोबस्तात सीमा हैदरने शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला होता. तिने सांगितले की, एटीएसने तिला विविध प्रश्न विचारले. यामध्ये जन्मस्थळापासून आतापर्यंतची माहिती विचारली गेली. पाकिस्तान लष्करात माझे काका सुभेदार असेल तरी त्याच्याशी कधीच संपर्क नव्हता, असा दावा तिने केला आहे. नेपाळच्या हॉटेल ऑपरेटर आणि तिकीट बुक करणाऱ्या बस एजंटचा दावाही तिने फेटाळला आहे.
पाकिस्तानातील कराची येथील रहिवासी सीमा हैदर आणि रबुपुरा येथील सचिन मीना यांची PUBG गेम खेळताना ओळख झाली होती. व्हिडिओ कॉलिंगद्वारे जवळीक वाढवल्यानंतर सीमा 13 मे रोजी नेपाळमार्गे पाकिस्तानातून भारतात आली होती. सीमा चार मुलांसह राबुपुरा येथे पोहोचली आणि आंबेडकरनगरमध्ये भाड्याने घर घेऊन सचिनसोबत राहत होती. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच सीमा आपल्या चार मुलांसह सचिनसह पळून गेली. हरियाणातील बल्लभगड येथून पोलिसांच्या पथकाने सर्वांना पकडले होते. यानंतर हा संपूर्ण प्रकार देशासमोर आला होता.
हेही वाचा :