संजय राऊत यांचा सवाल, महाराष्ट्र वाऱ्यावर आहे…राज्यपाल कुठे आहेत?
पुढारी ऑनलाईन डेस्क : आदीवासींप्रती असलेल्या भावनेपोटी द्रोैपदी यांना पाठिंबा दिलेला आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही, असे स्पष्ट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये आज राज्य सरकार व राज्यपालांवर निशाणा साधला.
येत्या १८ जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. या पदासाठी द्रोैपदी मुर्मू या एनडीए पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यांना एनडीए व्यतरिक्त इतर पक्षांनीही समर्थन केले आहे. द्रोैपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, "द्रोैपदी मुर्मू यांना पाठिंबा हा आदीवासीप्रती असलेल्या भावनेपोटी दिला आहे. द्रोैपदी या मातोश्रीवर याव्यात म्हणून त्यांना पाठिंबा दिलेला नाही."
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आदीवासी लोक आहेत. नंदुरबार, धुळे, गडचिरोली आदी भागात आदिवासी बांधव आहेत. शिवसेनेचे बरेच आमदार हे आदिवासी आहेत. सर्वांच्या भावना समजून घेतल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे कोणताही राजकीय हेतू नाही. द्रोैपदी मुर्मू यांना पाठींबा आहे. याचा अर्थ आम्ही एनडीएचा भाग हाेते, असे नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्याला राज्यपालांच्या मार्गदर्शनाची गरज : संजय राऊत
फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नव्हे. महाराष्ट्र वाऱ्यावर आहे. महाराष्ट्र पुन्हा लॉकडाउनमध्ये गेला आहे. राज्यात सरकार अस्तित्वात नाही. मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही. सरकारी अधिकारी जागेवर नाहीत. कोरोनाचे थैमान आहे, पूर आहे. अशावेळी मचे राज्यपाल जे आम्हाला मार्गदर्शन करत होते ते काेठे आहेत. राज्याला राज्यपालांच्या मार्गदर्शनाची गरज आहे, असा टाेलाही त्यांनी लगावला.
हेही वाचलंत का?
- Sourav Ganguly On Virat Kohli : विराटच्या खराब फॉर्मवर सौरव गांगुलींचे माेठे विधान, "त्याला स्वत:ला…"
- सातारा : हुल्लडबाज पर्यटकांवर पोलिसांचा वॉच ; कास, ठोसेघर मार्गावर चेकपोस्ट अन् पेट्रोलिंग
- नाशिक : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून सुहास कांदे यांना हटवले, 'यांना' दिली जबाबदारी
- Wedding Contract : हार घालताच नववधुने मुलाकडून सही करुन घेतले लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट (Video)

