Wedding Contract : हार घालताच नववधुने मुलाकडून सही करुन घेतले लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट (Video)

Wedding Contract : हार घालताच नववधुने मुलाकडून सही करुन घेतले लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट (Video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्नामधील अनेक वायरल व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल. अशा व्हिडिओमध्ये तुम्ही नवरा मुलगा मस्ती करताना, वऱ्हाडासोबत बेधुंद नाचताना पाहिला असाल, तर अशाच पद्धतीचे नववधुचे अनेक वायरल व्हिडिओ देखील पाहिले असाल. पण सध्या एका लग्नातला व्हिडिओ खूपच वायरल होताना पहायला मिळत आहे. ज्यामध्ये नववधुने दाखवलेल्या वेगळ्या अंदाजामुळे नवऱ्या मुलासह मुलाकडचीमंडळी देखील चकीत झाले. एवढेच नाहीतर वधुच्या मागण्या पाहुण त्यांची तोंडे सुद्धा पडल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. शिवाय सर्व पाहुणे मंडळींच्यामध्ये असणारा नवरा मुलगा नववधुने ठेवलेल्या मागण्यांना नकार न देताना त्याला मागण्या निमुटपणे मान्य कराव्या लागल्या. ही सारी गंमत पाहुण तुम्ही देखिल त्या नववधुचे कौतुक कराल आणि हा व्हिडिओ पाहून लोटपोट हसाल. (Wedding Contract)

सध्या सोशल मीडियात एक व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे. ज्यामध्ये एक नववधु आपल्या होणाऱ्या वरास हार घालते आणि योग्य क्षण पाहताच त्याला एक कॉन्ट्रक्ट (Wedding Contract) सही करण्यासाठी पुढे करते. यावेळी नवरामुलगा आपल्या मित्रांना व घराच्यामंडळीकडे पाहतो आणि अत्यंत उदास चेहऱ्याने त्या कॉन्ट्रक्ट पेपरवर सही करताना त्या व्हिडिओ दिसतो आहे. या कॉन्ट्रॅक्ट पेपर वरील मागण्या पाहून आपण सुद्धा त्या नववधुचे नक्कीच कौतुक कराल.

लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टमधील मागण्या (Wedding Contract)

वरमाला घातल्या नंतर या नववधुने आपल्या नवऱ्याकडून लग्नानंतर पाळाव्या लागणाऱ्या अटींच्या एका कॉन्ट्रॅक्टवर सही करुन घेतली. या अटी अत्यंत अनोख्या व तुम्हाला देखिल अंतर्मुख करणाऱ्या आहेत. या कॉन्ट्रॅक्टमध्ये आठ अटी व मागण्या आहेत त्या खालील प्रमाणे

  • महिन्यातून फक्त एकदाच पिझ्झा खावा लागेल.
  • घरातील जेवणाला नेहमी हो म्हणावे लागेल.
  • मी रोज साडीच घालणार
  • लेटनाईट पार्टी फक्त माझ्या सोबतच करु शकता.
  • रोज जीममध्ये व्यायाम करण्यासाठी जावे लागेल.
  • रविवारी नाष्टा बनवावा लागेल.
  • पार्टीमध्ये माझे चांगले फोटो काढावे लागतील.
  • दर १५ दिवसांनी शॉपिंगसाठी घेऊन गेले पाहिजे.

हा व्हिडिओ पाहून नववधुने सही करुन घेतलेल्या अनोख्या वेडिंग कॉन्ट्रॅक्टची युजर्स चांगलीच चर्चा करत आहेत. तसेच याला चांगल्या कमेंट देऊन रिप्लाय देत आहेत. एका मोठ्या कागदावर आकर्षक पद्धतीने लिहलेल्या कॉन्ट्रॅक्टला पाहून युजर्स यातील काही अटी चांगल्या असल्याचे तसेच काही अटी अत्यंत वाईट असल्याचे देखिल सांगत आहेत. एक युजर्स म्हणतो 'बरं झालं नवरीने सर्वांसमोर कॉन्ट्रॅक्ट साईन करुन घेतलं अन्यथा नंतर नवऱ्याने अटी मान्य केल्या नसत्या तर नवरा बदलनं अवघड गेलं असतं.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news