

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदु ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकरांना भारतरत्न द्यायला हवा. यांना अजून का सन्मानित करण्यात आलेले नाही. बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकरांना भारतरत्न देऊन सन्मानित केल्याने ते मोठे होणार नाहीत. तर या पदव्या मोठ्या होणार आहेत, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना केले.
बाळासाहेबांच्या विचारांची मशाल योग्य लोकांच्या हातात आहे. आम्ही सगळे, महाराष्ट्राची जनता बाळासाहेबांच्या विचाराने भारावले आहोत आणि श्वासाच्या शेवटपर्यंतच एकनिष्ठ राहील. दुसरे बाळासाहेब ठाकरे निर्माण होणार नाहीत आणि त्यांच्या नावाने जे तोतया निर्माण होत आहेत ते जास्त काळ टिकणारही नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी जगण्यात निष्ठा आणि अस्मिता जे निर्माण केलं ते कोणालाचं जमणार नाही. बाळासाहेबांकडे पाहिलं की वाटतं देशाच नेतृत्व किती खूजं आहे. शिवसेनेने खोटे आणि ढोंगीपणाचा कधी पुरस्कार केला नाही. पण दुर्देवाने महाराष्ट्रात काही ढोंगी बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत, असे ढोंग करत आहेत. या महाराष्ट्रात ढोंग चालणार नाही. या ढोंगाला लाथ मारली पाहिजे, असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. गद्दार लोकांचा ढोंगीपणा आहे. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला सह्याद्रीचं सुख दिलं कारण बाळासाहेब हे हिमालयाहून अधिक मोठे होते.
फडणवीस म्हणतायेत काहींना हिंदुह्दयसम्राट म्हणायला त्रास होतोय तेव्हा ते म्हणाले. बाळासाहेबांचे विचार आमच्या नसानसात आहेत. या पदव्या त्यांना लावायच्या असतील, असा टोला त्यांनी फडणवीसांना लावला. हिंदु ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकरांना भारतरत्न द्यायला हवा. यांना अजून का सन्मानिक करण्यात आलेले नाही. असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकरांना भारतरत्न देऊन सन्मानित केल्याने ते मोठे होणार नाहीत. तर या पदव्या मोठ्या होणार आहेत. असेही ते म्हणाले.