नारायण राणे यांच्या बंगल्यावर हातोडा; अधीश बंगल्यातील अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात | पुढारी

नारायण राणे यांच्या बंगल्यावर हातोडा; अधीश बंगल्यातील अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुंबईतील जुहू येथील अधीश बंगल्यातील अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरवात करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नारायण राणे यांनी आपल्या आपल्या बंगल्यातील अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरवात केली आहे. हे बांधकाम पाडण्यास दोन आठवड्यांची मुदत आहे. तरीही मुदतीच्या आत हे अनाधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यास राणे कुटुंबियांनी सुरुवात केली आहे.

माहिती अशी की,  माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार मुंबई महानगरपालिकेने केली होती. मात्र, आपण केलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप संतोष दौंडकर यांनी केला. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत सेक्शन 488 नुसार बीएमसीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना ही नोटीस बजावत पाहणी केली.  त्यानंतर महापालिकेने अनाधिकृत बांधकाम पाडण्यास नोटीस बजावली. त्यानंतर राने यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पण उच्च न्यायालयानेही नारायण राणे हे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले आणि १० लाख रुपये दंड ठोठावला. 

या आदेशाविरोधात राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली होती आणि  मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेला निर्णय कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

हेही वाचा

Back to top button