salman khan niece Alizeh Agnihotri
salman khan niece Alizeh Agnihotri

Farre Movie : सलमानची भाची अलीजेहच्या पहिल्या चित्रपटाचा टीजर (Video)

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवसांपासून अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीज आपल्या सोशल मीडियावर एक रहस्यमयी पोस्ट शेअर करत होते. या पोस्टरवर लिहिलं होतं- फर्रे. फर्रे हा चित्रपट सलमान खानची भाची अलीजेहचा (Farre Movie) पहिला चित्रपट आहे. अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम लावत निर्मात्यांनी आज टीजर जारी केलं आहे. (Farre Movie)

फर्रेच्या पहिल्या झलकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. प्रशंसक खूप कौतुक करतानाही दिसताहेत. फर्रेचे पोस्टर सलमान खानने देखील आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. सलमान आपली भाची अलीजेहला बॉलीवूड डेब्यूसाठी खूप पाठिंबा देत आहे. एक प्रेमळ मामा होण्याच्या नात्याने सलमानने काही दिवसांपूर्वी अलीजेहसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली होती.

फर्रेचा टीजर पाहून अनुमान लावू शकतो की, ही एक जबरदस्त थ्रिलर चित्रपट असेल. फर्रेचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांनी केलं आहे. चित्रपटात अलीजेह, जेन शॉ, साहिल मेहता, प्रसन्ना बिष्ट, रोनित बोस रॉय, जूही बब्बर सोनी प्रमुख भूमिकेत आहेत. फर्रे २४ नोव्हेंबरला रिलीज होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by ali (@alizehagnihotri)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news