Dev Anand : देव आनंद यांना काळे कपडे घालण्‍यास होती बंदी, सत्य की मिथक? | पुढारी

Dev Anand : देव आनंद यांना काळे कपडे घालण्‍यास होती बंदी, सत्य की मिथक?

पुढारी ऑनलाईन डेस्क : चॉकलेट हिरो देव आनंद आज हयात असते तर २६ सप्टेंबर, २०२३ रोजी १०० वाढदिवस साजरा केला असता. सदाबहार हिरो देव आनंद यांच्याबद्दल अनेक कथा-कहाण्या सांगितल्या जातात. पण, त्यांचे अनेक किस्से रंजक आहेत. (Dev Anand ) अनेकजण जुने जाणकार आणि मीडियामध्ये लोक सांगतात की, देव आनंद यांना कोर्टाने काळे कपडे वा काळा कोट घालण्यास रोखलं होतं. त्यावर बंदी होती. हेच कारण होतं की, काळ्या कोटमध्ये पाहून अनेक तरुणी उंच इमारतींवरून उडी घ्यायच्या तर कुणी म्हणायचे की, तरुणी आप्लाय रक्ताने पत्र लिहित असत. पण काळ्या कोटवरील बंदी लावण्यावर किती सत्यता आहे? की हे मिथक आहे? (Dev Anand)

ही गोष्ट १९९० च्या जवळपास पसरली. सोशल मीडियाच्या काळात ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. सप्टेंबर २००७ मध्ये देव आनंद यांची आत्मकथा प्रकाशित झाली होती. रोमांसिंग विथ लाईफ (Romancing With Life) असे आत्मकथेचे नाव होते. देव आनंद यांनी ही गोष्ट किती अफवा आहे, याबद्दल सांगितले. ‘एक मुर्खपणाने भरलेले मिथक’ असल्याचे म्हणत ते म्हणाले की, ही गोष्ट कदाचित काला पानी या चित्रपटापासून सुरु झाली असावी. देव आनंद यांनी आपल्या आत्मकथेत (Dev Anand Autobiography) काला पानी (१९५८) चा उल्लेख केला आणि हा चित्रपट किती आठवणीतला असल्याचे म्हटले होते.

काळ्या कपड्यांवर कोर्टाची बंदी ही बाब कुठून आली, यावर देव आनंद यांनी लिहिलं की, कदाचित ही गोष्ट यामुळे पसरली की, मी काला पानीमध्ये प्रत्येक वेळी काळे कपडे घातले होते. चित्रपटामध्ये मुलगा स्वत:ला वचन देतो की, तो आपल्या निर्दोष वडिलांना कायद्याच्या कचाट्यातून मुक्त करत नाही, तोपर्यंत नेहमी तो काळे कपडे घालेल. वास्तवात स्वत: देव आनंद यांच्या या स्पष्टीकरणाशिवाय काळ्या कपड्यांवर कोर्टाचे बंदीवाले मिथक एक तथ्य असल्याचे म्हटले जाते.

पहिले फिल्मफेयर

चित्रपट काला पानी (Film Kala Pani) साठी देव आनंद यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला फिल्मफेयर (Film fare Awards) पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटासाठी नलिनी जयवंत यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. देव आनंद यांनी चित्रपट विशेष असल्याचा उल्लेख करत लिहिलं की, काला पानीने जगाला माझ्याबद्दल एक कहाणीदेखील दिली, तेव्हापासून माझ्या फॅन्समध्येमध्ये ही कहाणी फिरत आहे. मला काळा कोट घालण्यावर बंदी आहे, कारण जेव्हा महिला मला काळ्या कपड्यांमध्ये पाहायच्या तेव्हा त्या बेशुद्ध व्हायच्या. हे एक मूर्खतापूर्ण मिथक आहे! मी नेहमीच आपल्या फॅन्ससाठी आणि चित्रपटात लोकांच्या मनोरंजनसाठी काळे कपडे घालत आलो आहे.

 

Back to top button