आता होऊ दे धिंगाणा : सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा घालणार धिंगाणा

आता होऊ दे धिंगाणा : सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा घालणार धिंगाणा

Published on

पुढारी ऑनलाईन : दर्जेदार मालिका आणि नवनव्या रिऍलिटी शोजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीचा लोकप्रिय कार्यक्रम 'आता होऊ दे धिंगाणा' चं दुसरं पर्व २१ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. सर्वांचा लाडका होस्ट सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

संबधित बातम्या 

नव्याने सामील झालेल्या सदस्यांसोबत यंदाचं पर्व नव्या जोशात रंगणार आहे. मागच्या पर्वात सुपरहिट ठरलेल्या 'साडे माडे शिंतोडे', 'बोबडी वळाली', 'धुऊन टाक', 'रेखाटा पटा पटा' या फेऱ्या या पर्वातही असणार आहेत. दोन मालिकांच्या टीममधली सांगितीक लढत प्रेक्षकांसाठी पर्वणी असेलच पण त्यासोबतच भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गमती-जमतीही या मंचावर उलघडणार आहेत.

अभिनेता सिद्धार्थ जाधव या नव्या पर्वासाठी अतिशय उत्सुक असून प्रेक्षकांप्रमाणेच मी सुद्धा या पर्वाची वाट पहात होतो अशी भावना सिद्धार्थने व्यक्त केली. 'आता होऊ दे धिंगाणा'ने टीआरपीचे नवनवे विक्रम रचले होते. हा कार्यक्रम जेव्हा संपला तेव्हा पुन्हा कधी सुरु होणार याची प्रेक्षकांकडून सातत्याने विचारणा होत होती. नवी ऊर्जा घेऊन हा कार्यक्रम लवकरच चाहत्याच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमात म्युझिक, मस्तीसोबत एक वेगळाच धिंगाणा असणार आहे.

त्यामुळे सिद्धार्थ जाधवची एनर्जी आणि प्रवाह परिवाराचा धिंगाणा एकत्र अनुभवायचा आता होऊ दे धिंगाणाचं दुसरं पर्वात पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news