

पुढारी ऑनलाईन डेस्क
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर ( International Space Station ) संकटाचे ढग दाटले आहेत. युक्रेनविरोधात युद्ध पुकारलेल्या रशियावर अमेरिका, युरोपीय संघासह जी ७ देशांनी विविध आणखी निर्बंध वाढवले आहेत. या निर्बंधांमुळे आता रशियाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. यापुढे निर्बंध कायम राहिल्यास इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर ( आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ) पाडण्यात येईल, अशी धमकी रशियन स्पेस एजन्सी रोसकॉसमॉसचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांनी दिली असल्याचे वृत्त 'एएफपी' वृत्तसंस्थेने दिले आहे.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे ५००टनाची असून ते पाडल्यास ते अमेरिका, भारत किंवा चीन कोठही पडू शकते. त्यामुळे संपूर्ण धोका तुमच्यावर आहे. तुम्ही यासाठी तयार आहात का? अशी धमकी यापूर्वी रशियन स्पेस एजन्सी रोसकॉसमॉसने दिली होती. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनशमध्ये रशियाची महत्वपूर्ण भागीदारी आहे. अमेरिका यासाठी रशियाचे सहाय्य घेते. आता पुन्हा एकदा रोसकॉसमॉसचे प्रमुखांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पाडण्याची धमकी दिल्याने जगभरातील देशांची चिंता वाढली आहे.
रशिया-युक्रेनमधील युद्धाचा आज १७ वा दिवस आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढतच आहे. जगातील अनेक देश विविध निर्बंध लादून रशियाची आर्थिक कोंडी करत आहेत. तरीही रशियाच्या युक्रेनमधुल विविध शहांवरील हल्ले सुरुच आहेत. राजधानी कीव्हच्या नजीक रशियन सैन्य पोहवले आहे. आता शहरातील पूर्व भागात आणि नीपर नदी परिसरात आणि ब्रोवरी येथे जोरदार लढाई सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. युक्रेनचे महत्त्वपूर्ण शहर मारियुपोलवरही रशियाने जोरदार हल्ले सुरु ठैवले आहेत. युक्रेनमधील सुमारे २० लाखांहून अधिक नागरिकांनी शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेतला आहे.
अमेरिकेने रशियाच्या सीमा असणार्या लातिवया, एस्टोनिया, लिथुआनिया आणि रोमानिया या देशांमध्ये १२ हजार सैनिक पाठऐले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिका रशियाविरोधात तिसरे महायुद्ध लढणार नाही. पण नाटोच्या कार्यक्षेत्रात येणार्या जमिनीच्या संरक्षणासाठी अमेरिका कटिबद्ध आहे.
हेही वाचलं का?