IND vs WI 3rd T20 : … तर हिटमॅन रोहित शर्माच्‍या नावावर आज होणार ‘या’ विक्रमाची नोंद

IND vs WI 3rd T20 : … तर हिटमॅन रोहित शर्माच्‍या नावावर आज होणार ‘या’ विक्रमाची नोंद
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

टीम इंडिया आज वेस्‍टइंडिज विरुद्‍ध टी-२० मालिकेतील तिसरा सामना ( IND vs WI 3rd T20 ) खेळणार आहे. कोलकाताच्‍या ईडन गार्डन मैदानावर ही लढत रंगणार आहे. आज सर्वांच्‍या नजरा कर्णधार रोहित शर्मा याच्‍या खेळीकडे असणार आहेत. कारण आज रोहितची फलंदाजी बहरल्‍यास त्‍याच्‍या नावावर आणखी एका नव्‍या विक्रमाची नोंद होणार आहे.

IND vs WI 3rd T20 : राेहितने ४४ धावा करणे आवश्‍यक

आजच्‍या टी-20 सामन्‍यात रोहित शर्मा याने ४४ धावा करणे आवश्‍यक आहे. त्‍याने अशी कामगिरी केली तर तो जगातील टी -20 आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरणार आहे. सध्‍या न्‍यूझीलंडचा ३५ वर्षीय सलामीवीर मार्टिन गुप्‍टिल याच्‍या नावावर सर्वाधिक विक्रम आहे.  दुसर्‍यास्‍थानी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आहे. सध्‍या सर्वाधिक धावा करण्‍याच्‍या विक्रमात रोहित शर्मा हा तिसर्‍या स्‍थानी आहे.

गप्‍टिल याने टी-२० आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये आतापर्यंत ११२ सामने खेळले आहेत. यामध्‍ये त्‍याने १०८ डावांमध्‍ये ३२.७ सरासरीने ३ हजार २९९ धावा केल्‍या आहेत. त्‍याने दोन शतके तर २० अर्धशतके फटकावली आहे. तर विराट कोहलीने आतापर्यंत ९७ सामने खेळले आहेत. यातील ८९ डावात त्‍याने ५१.५० सरासरीने ३ हजार २९६ धावा केल्‍या आहेत. विराटने ३० डावांमध्‍ये अर्धशतकी खेळी केली आहे.

रोहित शर्माचा विचार करता त्‍याने टी-20 फॉर्मेटमध्‍ये १२१ सामने खेळले आहेत. यातील ११३ डावात त्‍याने ३३.२२ सरासरीने ३ हजार २५६ धावा केल्‍या आहेत. रोहित शर्मा यान चार शतके तर २६ अर्धशतके फटकावली आहे, टी-20 आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये ११८ ही त्‍याची सर्वात्‍कृष्‍ट धावसंख्‍या आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news