Sachin Tendulkar : सचिन कधीही आपला मुलगा अर्जुनची मॅच पहात नाही

Sachin Tendulkar : सचिन कधीही आपला मुलगा अर्जुनची मॅच पहात नाही
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा दिग्गज आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) याने त्याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याची मॅच कधीच बघत नसल्याचे आश्चर्यकारक विधान केले आहे. त्यामुळे सर्वांनाच हा प्रश्न पडला आहे की, येवढा महान फलंदाज असताना स्वत:च्या मुलाचा सामना कसा काय बघत नसेल. सचिनमुळे साहजिकच अर्जुनला अगदी लहानपणा पासून प्रसिद्धी मिळाली आहे. आता तो क्रिकेटपटू म्हणून देखिल ओळख कमवू लागला आहे. नुकताच अर्जुनला मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयात खरेदी केले. सचिनने एका मुलाखती दरम्यान आपण अर्जुनचा सामनाच पहात नसल्याचे सांगत तो असे का करतो याचे उत्तर देखिल दिले आहे.

सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याने 'इन-डेप्थ विथ ग्रॅहम' या कार्यक्रमात भाग घेतला होता. तेव्हा त्याला अर्जुन बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नास उत्तर देताना वरील खुलासा केला. याचे कारण देताना सचिन म्हणाला, आपल्या मुलाला खेळावर प्रेम करण्याचे स्वातंत्र्य मिळावे ही त्यामागची भावना आहे. तसेच पुढे सचिन म्हणाला, जेव्हा पालक त्यांच्या मुलाचा खेळ पहात असतात तेव्हा ते तणावग्रस्त होतात. त्यामुळे मी अर्जुन खेळत असलेला सामना पहात नाही. शिवाय मला असे वाटते की, त्याला क्रिकेटवर प्रेम करण्याचे स्वातंत्र्य मिळावे, तसेच त्याला जे करायचे आहे त्यावर तो एकाग्र व्हावा असे मला वाटते. म्हणून मी त्याचा सामना पहात नाही.

याशिवाय सचिन तेंडूलकर ( Sachin Tendulkar ) अर्जुन बाबत पुढे म्हणाला, त्याला खेळावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मी जाऊन त्याचा खेळ पाहिला तरी कुठेतरी लपून त्याचा सामना बघेन. या कार्यक्रमात सचिन म्हणाला, आम्ही त्याला कधीच क्रिकेटमध्ये करिअर करण्यास सांगितले नाही. अर्जुनला फुटबॉलची आवड होती आणि नंतर त्याला बुद्धिबळ खेळायला आवडू लागले. त्यांच्या आयुष्यात क्रिकेट नंतर आले.

याच कार्यक्रमात सचिनने आणखी एका गोष्टीचा खुलासा केला. सचिन जेव्हा 2013 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला तेव्हा कोहलीने त्याला एक खास भेट दिली होती, जी नंतर त्याने त्याला परत केली. याबाबत सचिन म्हणाला की, निवृत्तीच्या दिवशी मी खूप भावूक झालो होतो. विराट माझ्याकडे आला आणि त्याच्या वडिलांनी त्याला दिलेला पवित्र धागा त्याने मला दिला.

सचिनने कार्यक्रमात सांगितले की, कोहलीने दिलेली ती भेट मी काही काळ माझ्याजवळ ठेवली होती. मग मी ते कोहलीला परत दिले. मी त्याला म्हणालो की हे तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि ते तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्याबरोबर राहावे आणि कोणीही नाही. या तुझ्या आठवणी आहेत. सचिन म्हणाला, तो क्षण एक भावनिक क्षण होता, जो माझ्या कायम स्मरणात राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news