रोहित शर्मा मीडियावर भडकला; म्हणाला, ‘युझवेंद्र-धनश्रीबद्दल कुणी अफवा पसरवली?

रोहित शर्मा मीडियावर भडकला; म्हणाला, ‘युझवेंद्र-धनश्रीबद्दल कुणी अफवा पसरवली?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघ 2022 च्या आशिया चषक मोहिमेची सुरुवात 28 ऑगस्ट रोजी दुबईत पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. त्याआधी संघ सरावात गुंतला असून अनेक वेगवेगळे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनीही अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात रोहित शर्मा पत्रकारांना जाब विचारताना दिसत आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या नात्याबद्दल कुणी अफवा पसरवली? असा सवाल तो पत्रकारांना करतो.

व्हायरल व्हिडिओमध्ये रोहित शर्मा पत्रकारांना जाब विचारताना दिसत आहे. तो म्हणतो की, 'याची (चहल) चर्चा कोणी सुरू केली? माझी त्याच्याशी ओळख करून द्या.' रोहितच्या या प्रश्नावर कुणीतरी उत्तर देते की, 'आम्ही ती अफवा पसरली नाही. फक्त एक प्रश्न विचारला, नंतर तो युझवेंद्र चहलशी देखील बोलला होता.'

आशिया कपसाठी टीम इंडिया यूएईला रवाना होण्यापूर्वी भारतीय लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट होणार अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. दोघांमध्ये मतभेद असल्याचे वृत्त पसरल्याने क्रिकेट जगतासह चाहत्यांमध्ये खळबळ माजली होती.

कुठून सुरू झाला वाद?

वास्तविक युझवेंद्रची पत्नी धनश्रीने अचानक इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या नावापुढील चहल हे आडनाव हटवलं. तेव्हापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल विभक्त होणार की काय, अशी चर्चा रंगली. लग्नानंतर धनश्री तिच्या नावापुढे पती युजवेंद्रचं चहल हे आडनाव जोडलं होतं. मात्र पण लग्नाच्या अवघ्या 1 वर्ष 8 महिन्यांनंतर अचानक तिने तिच्या नावापुढचे चहल हे आडनाव काडून टाकले. त्यामुळे दोघांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा केली जाऊ लागली. मात्र, लगेचच चहल आणि धनश्री या दोघांनीही इन्स्टाग्रामवर आपली प्रतिक्रिया पोस्ट केली आणि या सर्व गोष्टी अफवा असल्याचे म्हणत आपल्या विरोधीतील दावे फेटाळून लावले.

दोन दिवसांनंतर धनश्री आणि युझवेंद्र दोघेही एकाच रील व्हिडिओमध्ये दिसले. यानंतर दोघांमधील मतभेदाच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला. धनश्री आणि युझवेंद्रचे लग्न हे 'चट मंगनी पट ब्याह' याच प्रकारात मोडते. लॉकडाऊनमध्ये डान्स क्लासद्वारे चहल पहिल्यांदा धनश्रीला भेटला. त्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये दोघांमध्ये जवळीक वाढली आणि डिसेंबर 2020 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नापासून ते आतापर्यंतच्या दीड वर्षांच्या प्रवासात ही जोडी चाहत्यांसाठी सुपरहिट ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news