IND vs PAK : टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मधून ‘हा’ खेळाडू ’आऊट’ होणार! | पुढारी

IND vs PAK : टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मधून ‘हा’ खेळाडू ’आऊट’ होणार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेत आज आज (28 ऑगस्ट) टीम इंडिया कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या हायव्होल्टेज सामन्यात सर्वांच्या नजरा दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर असतील. शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांच्या दुखापतीमुळे पाकिस्तान त्रस्त असताना, भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार रोहित शर्माला खूप काही करावे लागणार आहे. टीम इंडियाच्या केएल राहुल, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंनी पुनरागमन केले आहेत. त्याचबरोबर युवा खेळाडूंनीही आपल्या चमकदार कामगिरीने कर्णधार रोहित शर्माचेही लक्ष वेधून घेतले आहे.

भारताच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर टाकल्यास उपकर्णधार केएल राहुल रोहित शर्मासह डावाची सुरुवात करताना दिसेल, तर त्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत हे फलंदाजीला उतरतील. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा हे अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे टॉप 7 खेळाडू निश्चित असल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत रोहित शर्माला अनुभवी दिनेश कार्तिकला संघातून वगळण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. कार्तिक गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि त्याने टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका बजावली आहे. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी तो प्लेइंग इलेव्हनमध्ये फिट नसल्याची चर्चा आहे.

रोहित शर्मा दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरणार असल्याचे समजते. वेगवान गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंग हा भुवनेश्वर कुमारला साथ देईल, तर हार्दिक पांड्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावेल. दुसरीकडे, रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि युझवेंद्र चहल हे फिरकीपटू युएईच्या परिस्थितीचा फायदा घेतील अशी शक्यता. हार्दिकने चार षटकांचा कोटा पूर्ण केल्यास अश्विनच्या जागी रोहितला कार्तिकला खेळवण्याची संधी मिळेल, पण रोहितला फलंदाजीत इतकी खोली निर्माण करायची नाही.

पाकिस्तानविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन अशी आहे…

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग

भारताविरुद्ध पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन अशी आहे…

मोहम्मद रिझवान, बाबर आझम, फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, मोहम्मद हसनैन, शादाब खान, उस्मान कादिर, हरिस रौफ, नसीम शाह/शहनवाज दहनी

Back to top button