

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीला मंजुरी दिल्याचे पत्र काँग्रेसने ट्विट केलं आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती; पण राज्यसभेवर रजनी पाटील यांची वर्णी लागली. यावेळी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते.
राजीव सातव हे २२ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर पुण्यातील जहाँगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु हाेते. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.
राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव राजकारणात सक्रीय झाल्या. काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. राज्यसभेचे तिकीट प्रज्ञा सातव यांना मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या; पण सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली. आता काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे