Shivshahir ‍Babasaheb Purandare : आपण आमचे जीवन समृद्ध केलेत : संजय राऊत | पुढारी

Shivshahir ‍Babasaheb Purandare : आपण आमचे जीवन समृद्ध केलेत : संजय राऊत

मुंबई, पुढारी ऑनलाईन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir babasaheb purandare) यांचे आज सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक होती. पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात होते. पुरंदरे (Shivshahir ‍Babasaheb Purandare) यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जातोय.

त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे राज्याची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त केली. बाबासाहेब हे राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील महत्वाचे पाईक होते. इतिहासाच्या पानावार त्यांचे नाव कोरले होते. शिवरायांचा इतिहास प्रत्येक घराघरात कसा पोहोचवला जाईल हे ते पहायचे. छत्रपती शिवरायांसंबंधी काही माहिती हवी असल्यास त्यांच्याशी चर्चा व्हायची, असे राऊत म्हणाले.

पुरंदरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच शिवसेना पक्षाशीही त्यांचे जवळचे संबंध होते. बाबासाहेब (Shivshahir ‍Babasaheb Purandare) अमर होते आणि ते यापुढेही राहतील. आपण आमचे जीवन समृद्ध केलेत! महाराष्ट्र सदैव अपल्या ऋणात राहील!!! या भावनिक शब्दांत राऊत यांनी ट्विट करून पुरंदरेंना श्रद्धांजली वाहिली.

हे ही वाचा :

 

 

Back to top button