Puneeth Rajkumar dies : पुनीत राजकुमारच्या अकाली एक्झिटने बॉलिवूडसह क्रीडा जगतही हळहळले

Puneeth Rajkumar dies : पुनीत राजकुमारच्या अकाली एक्झिटने बॉलिवूडसह क्रीडा जगतही हळहळले
Published on
Updated on

लोकप्रिय कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारला (Puneeth Rajkumar) जिममध्ये वर्कआउट करताना हार्ट ॲटॅक आला. हार्ट ॲटॅकनंतर लगेच त्यांना बंगळुरुतील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. Puneeth Rajkumar हे ४६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कर्नाटकात दु:खाची लहर आहे. कर्नाटक राज्यात सर्व सिनेमागृहे बंद केले जात आहेत. दरम्यान, कर्नाटकाचे मुख्यंमंत्री बसवराज बोम्मईदेखील रुग्णालयात पोहोचले होते. फॅन्सनी रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी केली आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांनीही त्यांना श्रध्दांजली वाहिलीय. बॉलीवूड स्टार सोनू सूदने Heartbroken ?
Will always miss you my brother. #PuneethRajkumar असे ट्विट करत श्रद्धांजली वाहिलीय.

प्रसिध्द दिग्दर्शक, निर्माता रामगोपाल वर्मानेदेखील ट्विट करून श्रद्धांजली वाहिलीय. बोनी कपूर यांनीही ट्विटरवर श्रद्धांजली दिलीय.

राम गोपाल वर्माने ट्विटमध्ये लिहिलंय-'पुनीत राजकुमार यांचा आकस्मिक मृत्यू एक ट्रॅजेडी आहे. हे एक खूप भयानक डोळे उघडणारं सत्य आहे. आपल्यापैकी कुणीही कधीही मरू शकतं. यासाठी जीवन फास्ट फॉरवर्ड मोडवर जगणं सर्वात चांगलं आहे.'

आर माधवन म्हणाला- मन तुटलं

आर माधवनने दु:ख व्यक्त करत लिहिलंय-निघून गेले, सर्वात प्रेमळ, दयाळू आणि नोबल आत्मापैकी एक. मला माहित नाही मी काय अनुभवत आहे. मी खूप स्तब्ध आहे. भाई तू आमचं सर्वांचं मन मोडून, कन्फ्यूज करून निघून गेले. आज स्वर्ग प्रकाशित झाला. मी आताही आशा करत आहे की, हे खरं नसावं. हाथ जोडून, हाथ जोडून, हाथ जोडून, मन तुटलं.

अभिनेते पुनीत यांना फॅन्स 'अप्पु' म्हणायचे. अप्पु यांनी २९ हून अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केलंय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news