Anusha Dandekar : करण कुंद्राच्या एक्स-गर्लफ्रेंडची हॉट बिकिनी व्हायरल | पुढारी

Anusha Dandekar : करण कुंद्राच्या एक्स-गर्लफ्रेंडची हॉट बिकिनी व्हायरल

पुढारी ऑनलाईन :

मागील काही दिवसांपासून अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) बिग बॉसमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू होती. असं म्हटलं जात होतं की, करण-तेजस्वी यांच्यामध्ये लवकरचं अनुषा दांडेकरची (Anusha Dandekar) बिग बॉस १५ मध्ये एन्ट्री होणार आहे. पण, अनुषाने या सर्व गोष्टींना निराधार सांगितले होते. बिग बॉस १५ मध्ये आजकाल एक लव्हस्टोरी सुरू झालीय. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची जवळीकता वाढताना दिसत आहे. दोघांचे काही रोमँटिक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. करणने शमिता समोर त्याची एक्स-गर्लफ्रेंड अनुषा विषयी खुलासे केले होते.

मागील काही दिवसांपासून अनुषा बिग बॉसमध्ये येणार , अशा चर्चा सुरू होत्या. पण, अनुषाने या चर्चांना पूर्णविराम दिला.

अनुषाने बिकिनी फोटो शेअर केलाय. तिने कॅप्शन लिहिलीय- ‘बी ने सुरू होणाऱ्या केवळ दोन शब्दांवर तुम्हाला लक्ष द्यायला हवं… ब्राउन आणि ब्यूटिफुल..लवकरचं येत आहे @brownskinbeautyoffic’

बिग बॉसमध्ये एन्ट्रीचे खंडन करत अनुषाने पोस्ट केलीय, ‘काही लोक तुमच्यावर प्रेम करतात. प्रेम तुमच्या जवळपास असंत आणि ते प्रेम तुमच्यासाठी काय करू शकतं? हे अंतर जाणून घ्या.

शेवटच्या ओळीत तिने लिहिलंय- ‘प्रेम मतभेद समजतो.’ अनुषा दांडेकरची ही पोस्ट करणच्या वक्तव्यानंतर शेअर झालीय. त्यामुळे हा कयास लावला जात आहे की, ही पोस्ट करणसाठी आहे. अनुषाने आपल्या पोस्टमध्ये करणचं नाव घेतलेलं नाही.

एक वेळ अशी होती की, टीव्ही विश्वात अनुषा दांडेकर-करण कुंद्राच्या प्रेमाचे किस्से रंगायचे. त्यांच प्रेम रिॲलिटी शो ‘लव्ह स्कूल’ दरम्यान सुरू झालेले हे प्रेम होतं. त्यांची ही लव्ह स्टोरी अधिक काळ टिकू शकली नाही.

तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअप झाल्यानंतर अनुषाने करणवर धोका दिल्याचा आरोप केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

 

View this post on Instagram

 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

 

View this post on Instagram

 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

 

View this post on Instagram

 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

 

View this post on Instagram

 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

 

View this post on Instagram

 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

Back to top button