Puneeth Rajkumar : अभिनेता पुनीत राजकुमारचे हार्ट ॲटॅकने निधन

Puneeth Rajkumar : अभिनेता पुनीत राजकुमारचे हार्ट ॲटॅकने निधन
Published on
Updated on

प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार  (Puneeth Rajkumar)  यांचे उपचारादरम्यान निधन झाले. शुक्रवारी सकाळी ४६ वर्षीय पुतीन राजकुमार यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्येनंतर त्यांना बेंगलोर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते.

पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar ) यांना शुक्रवारी सकाळी छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना जोराचा झटका आला. त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करून त्यांना बेंगलोर येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर डॉक्टरांची एक टीम उपचार करत होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. मात्र, काही वेळातच पुतीन यांचा मृत्यू झाला.

पुनीत यांना अप्पू नावाने त्यांचे फॅन्स ओळखत होते. स्टार ॲक्टर राजकुमार यांचा मुलगा असलेल्या पुनीत यांनी आपल्या अभिनयाने वेगळी छाप उमटवली होती. त्यांनी २९ हून अधिक कन्नड सिनेमांमध्ये काम केले. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या सिनेमा करिअरला सुरुवात केली. बेस्ट चाइल्ड आर्टिस्टचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला होता.

१९८५ मध्ये आलेल्या Bettada Hoovu या सिनेमातील कामासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यांना कर्नाटक राज्य बेस्ट चाइल्ड अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित केले होते. चालीसुवा मोदगळू और येराडू नक्षत्रगालू या सिनेमांमध्ये त्यांच्या अभिनयामुळे त्यांनी चाहत्यांच्या ह्रदयात स्थान मिळविले होते.

२००२ पासून पुनीत अप्पू नावाने फेमस झाले होते. 'अभी', 'वीरा कन्नडिगा', 'अजय', 'अरासु', 'राम', 'हुडुगारु' और 'अनजनी पुत्र' यांसारख्या गाजलेल्या सिनेमांत त्यांनी काम केले होते. त्यांचा शेवटचा सिनेमा युवारथना या वर्षीच रिलीज झाला होता.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news