

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीररित्या ५६ लाख ४८ हजारांच्या चार हजार किलो विमल गुटख्याची वाहतुक करणार्या ट्रक चालकाला गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने अटक केली. याप्रकरणी ट्रक चालकांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी २४ लाख ५० हजारांचा ट्रक देखिल पोलिसांनी जप्त केला. (pune crime)
प्रविण दुर्योधन जाधव (२६, रा. मु. पो. गुरसाळे, खटाव जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. दरम्यान, ट्रक मालक सोमनाथ भिमराव जाधव आणि सुजित खिंवसारा या दोघांवरही लोणी-काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. २१) जानेवारी रोजी गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे अधिकारी आणि अमंलदार गस्त घालत असताना लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सोलापूर रोडने एक आयशर ट्रक मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गुटखा घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली.
युनिट ६ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा येथे आयशर ट्रक आडवला.
यावेळी प्रविण जाधव याला ताब्यात घेतले. अन्न व औषध प्रशासन अधिकार्यांशी संपर्क साधल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी कोकणे तेथे आले. ट्रकची तपासणी केल्यानंतर ट्रकमध्ये तब्बल गुटख्याच्या तब्बल १५० गोण्या सापडल्या.
त्या गोण्यांमध्ये ५६ लाख ४८ हजारांचा ४ हजार किलो गुटखा असल्याचे आढळले. तसेच २४ लाख ५० हजारांचा ट्रक असा तब्बल ८१ लाखांचा मुद्देमाल युनिट ६ ने पकउला. पकडण्यात आलेला गुटख्याची किंमत सध्याच्या बाजारभावा प्रमाणे किंमत कोट्यवंधीची असल्याचे पोलिस अधिकार्यांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक सुधीर टेंगले, अमंलदार, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन शिंदे, नितीन मुंढे यांनी केली.
हेही वाचलत का ?