R Value : कोरोनाचा धोका होतोय कमी? सलग दुसर्‍या आठवड्यात ‘आर -व्‍हॅल्‍यू’ झाला कमी | पुढारी

R Value : कोरोनाचा धोका होतोय कमी? सलग दुसर्‍या आठवड्यात 'आर -व्‍हॅल्‍यू' झाला कमी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

कोरोनाची तिसर्‍या लाटेमुळे अनेक राज्‍यांमध्‍ये पुन्‍हा एकदा विविध निर्बंध लावण्‍यात आले आहेत. यामुळे मागील काहीमहिन्‍यांपासून गतीमान झालेल्‍या विविध क्षेत्रांना काहीसा ब्रेक लागेल, अशी भीती होती. मात्र आयआयटी मद्रासने केलेल्‍या
विश्‍लेषणात ‘आर -व्‍हॅल्‍यू’ (R Value ) कमी झाल्‍याने कोरोनाचा धोका कमी होताना दिसत आहे.

देशात मागील चार दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्‍ण आढळत आहेत. मागील २४ तासांमध्‍ये ३ लाख ३३ हजार ५३३ नवे रुग्‍ण आढळले आहेत. शनिवारच्‍या तुलनेत हा आकडा ४ हजार १७१ ने कमी असल्‍याने थोडा दिलासा मिळाला.

R Value : वर्षाच्‍या सुरुवातीला प्रथमच ‘आर -व्‍हॅल्‍यू’मध्‍ये घसरण

आता मद्रास आयआयटीने कोरोना संसर्गाबाबत केलेल्‍या विश्‍लेषणातून एक चांगली माहिती समोर आली आहे. २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत देशातील ‘आर -व्‍हॅल्‍यू’ हा २.९ इतका झाला होता. यावर्षी ७ ते १३ जानेवारीमध्‍ये प्रथम यामध्‍ये घसरण झाली. तसच सलग दुसर्‍या आठवड्यात कोरोना विषाणूचा ‘आर -व्‍हॅल्‍यू’ झाला कमी आहे. देशभरात १४ ते २१ जानेवारी या कालावधीत ‘आर -व्‍हॅल्‍यू’ हा १.५७ इतका आहे. जेवढा ‘आर -व्‍हॅल्‍यू’ कमी होईल तेवढ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा दरही कमी होणार आहे.

आर-व्‍हॅल्‍यू म्‍हणजे काय ?

आर-व्‍हॅल्‍यू म्‍हणजे विषाणूच्‍या पुनरुत्‍पादन मूल्‍य. कोरोनाचा संसर्ग झालेले व्‍यक्‍ती किती लोकांमध्‍ये संसर्गाचा प्रसार करु शकते हे आर-व्‍हॅल्‍यूवरुन स्‍पष्‍ट हाेते. आर -व्‍हॅल्‍यू जास्‍त असेल तर याचा अर्थ त्‍या भागात कारेोनाचा संगर्स वाढू लागला आहे. कोरोना संसर्ग झालेली व्‍यक्‍तीपासून एका पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण होण्‍याचा धोका असतो. त्‍यामुळे आर-व्‍हॅल्‍यू कमी होणे हा संसर्ग कमी होण्‍याचे संकेत असतात, असे विश्‍लेषकांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button