'ईडी'ला धाडी टाकायला पाठवा, आम्ही तयार आहोत : केजरीवाल यांचे केंद्राला आव्‍हान - पुढारी

'ईडी'ला धाडी टाकायला पाठवा, आम्ही तयार आहोत : केजरीवाल यांचे केंद्राला आव्‍हान

नवी दिल्लीः पुढारी ऑनलाईन

आम्ही काही चुकीचे केलेले नाहीय. केंद्र सरकार सक्‍तवसुली संचालनालयाचा ( ईडी)  वापर राजकीय हेतूने करत अआहे, असा आराेप करत  “तुम्ही ‘ईडी’ला धाडी टाकायला पाठवा, आम्ही तयार आहोत, असे आव्‍हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला दिले.

यावेळी केजरीवाल म्‍हणाले, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आल्या आहेत. पंजाब निवडणुकीआधी ‘ईडी’च्‍या जाणीवपूर्वक धाडी टाकल्या जातील. दिल्लीचे आरोग्यमंत्री सतेंद्र जैन यांना अटक केली जाईल.; पण आ्म्हाला त्याची भ[ती नाही. यापूर्वीही मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्यावर धाडी पडल्या होत्या. त्यामधूनही काही निष्पन्न झालेले नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

आम्ही काही चुकीचे केलेले नाहीय. आमच्या नेत्यांवर यापूर्वीही  धाडी टाकून झाल्या आहेत. आम्ही केंद्र सरकारला सांगतोय तुम्ही ईडीला धाडी टाकायला पाठवा. आम्ही तयार आहोत मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, भगवंत मान या नेत्‍यांवर धाडी टाका. आम्ही स्वागत करतो, अशा शब्‍दांमध्‍ये त्‍यांनी केंद्र सरकारला आव्‍हान दिले.

हेही वाचलंत का?

Back to top button