PSI pallavi Jadhav
PSI pallavi Jadhav

PSI Pallavi Jadhav : अभिनेत्री, पीएसआय पल्लवी अडकल्या लग्नबंधनात

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री आणि पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव (PSI Pallavi Jadhav) या विवाहबंधनात अडकल्या. पल्लवी आणि कुलदीप यांचा विवाहसोहळा रविवारी १५ मे रोजी पार पडला. पीएसआय पल्लवी (PSI Pallavi Jadhav) यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही सुंदर अभिनेत्री दंबग पोलिस अधिकारी म्हणून प्रसिध्द आहे. त्यांचा राजेशाही थाटात विवाहसोहळा पार पडला. या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याआधी त्यांनी मेहंदी आणि हळदीचे फोटो शेअर केले होते.

कोण आहेत पल्लवी जाधव?

पल्लवी मूळच्या औंरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. त्यांचे रेल (ता. कन्नड) हे गाव आहे. एक पोलिस अधिकारी असलेल्या पल्लवी या हैद्राबाद कस्टडी या आगामी चित्रपटात दिसणार आहे. बालपणापासून पल्लवी यांना अभिनय क्षेत्रात जायचं होतं. पण, नियतीने पीएसआय बनवलं.

२०१५ मध्ये कमवा व शिका या योजनेतून ८० टक्के गुण मिळवून एम. ए. मानसशास्त्र विषयाची पदवी त्यांनी मिळवलीय. त्या पीएसआय परीक्षेतही उत्तीर्ण झाल्या. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना पीएसआय पद मिळाले. घरची जेमतेम परिस्थिती असतानाही त्यांनी मेहनत केली आणि पीएसआय पदापर्यंत पोहोचल्या. त्या पल्लवी या जालन्यातील महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकाचं नेतृत्व करतात.

पल्लवी जाधव या मुळातचं इतक्या सुंदर आहेत की, त्यांना पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही की त्या पीएसआय आहेत.

पीएसआय पल्लवी जाधव यांनी आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शिवाय व्हिडिओही पाहायला मिळताहेत. त्यांचे सोशल मीडियावर मोठे फॅन फॉलोईंग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news