अल्पवयीन मुलीच्या किडनॅपिंगप्रकरणी नेवाशाचे पोलिस निरीक्षक पोवार चौकशीच्या फेर्‍यात | पुढारी

अल्पवयीन मुलीच्या किडनॅपिंगप्रकरणी नेवाशाचे पोलिस निरीक्षक पोवार चौकशीच्या फेर्‍यात

नगर : पुढारी वृत्तसेवा
नेवाशाचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी अपहरणाच्या गुन्ह्यात पैसे घेतल्याच्या आरोपाची दखल पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घेतली असून, पोवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. त्यांची उपअधीक्षकांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. पोलिस निरीक्षक पोवार यांच्या जागी पोलिस निरीक्षक विजय करे यांची नियुक्ती करण्यात आली.
अल्पवयीन मुलीच्या अहपरणाच्या गुन्ह्यात पोवार यांनी मध्यस्ताकडून सव्वा लाख रूपये घेतल्याचा आरोप तक्रारदारांनी पोलिस अधीक्षकांकडे केला.
त्याची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी पोवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. त्यांच्या जागी करे यांची नियुक्ती केली. पोवार यांची पोलिस उपअधीक्षकांमार्फत चौकशी सुरू आहे. चौकशीअंती काही निष्पन्न झाल्यास रितसर कारवाई करण्यात येईल, असे सूत्रांकडून समजले. दरम्यान, विजय करे यांच्याकडे पूर्वी नेवासा पोलिस ठाण्याचा पदभार होता. त्यावेळी ते वादग्रस्त ठरले होते. आता पुन्हा त्यांच्याकडे नेवासा पोलिस ठाण्याच्या पदभार दिल्याने उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button