पंतप्रधानांच्या वंदे मातरम् काव्यांजलीचे उद्या लोकार्पण

पंतप्रधानांच्या वंदे मातरम् काव्यांजलीचे उद्या लोकार्पण
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सुश्राव्य कवितांनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही कविता संगीत साज लेऊन श्रोत्यांच्या भेटीला येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित 'वंदे मातरम्… अपनी शान' या काव्यांजलीचा लोकार्पण सोहळा मोदींच्या वाढदिवशी म्हणजेच रविवारी (१७ सप्टेंबर) दिल्लीत होणार आहे.

मदरलँड इंटरनॅशनल फाऊंडेशनतर्फे या काव्यांजलीची सीडी प्रकाशित करण्यात येणार आहे. संगीतकार संजय हांडे यांनी संगीतबद्ध केलेल्या या कवितेचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेले इंद्रेशकुमार यांच्या हस्ते होणार आहे. रंगभवनात हा प्रकाशन कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news