‘परी’ ची आई एकदम कडक ?; प्रार्थना बेहेरेचा निळ्या स्लिव्हलेसमध्ये हॉट लूक

प्रार्थना बेहेरे
प्रार्थना बेहेरे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत अथक प्रयत्नानंतर अखेर यश आणि नेहाचे लग्न पार पडले आहे. या मालिकेतील यश अभिनेता श्रेयस तळपदे आणि नेहा म्हणजे, मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्‍या भूमिका चाहत्‍यांच्‍या  पसंतीस  उतरल्‍या आहेत.  या मालिकेत लग्नानंतर नवीन जोडपे यश- नेहा रोमॉन्टिक मूडमध्ये दिसतात. तर सध्या प्रार्थना बेहेरेच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर स्लिव्हलेस निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली आहे. यासोबत केसांची बन स्टाईल, मेकअप आणि नेकलेसने तिच्या सौदर्यात भर घातली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Never stop dreaming blue … ???'. लिहिली आहे. यावरून प्रार्थना लग्नानंतर निळ्या रंगाच्या स्वनात दंग झाल्याचे दिसतेय.

विशेष म्हणजे, प्रार्थनाने घातलेल्या स्लिव्हलेस ड्रेसची चर्चा जोरदार होत आहे. तर या फोटोला #blue #colourofpeace #newshoot #photoshoot #lifeisbeautiful #happiness #beyou ##happyme #prarthanabehere असे हॅसटॅगदेखील दिले आहेत. प्रार्थनाने आपल्या कमरेवर हात ठेवून काही फोटोंना पोझ दिली आहे. याच दरम्यान प्रार्थनाने मेकअप करताना एका व्हिडीओ शेअर केला आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने 'अति सुंदर', 'उफ्.. तेरी अदा', 'एकदम कडक', 'हाय स्वीट हार्ट ❤️', 'परीची आई खूप छान दिसतेय ❤️'. तर दुसऱ्या एका युजर्सने 'Pretty ?', 'Gorgeous', 'uffffff', 'Mind blowing beauty', 'Pretty', 'Wahhhh', 'Nice', 'Hotness overload', 'Cute', 'Nice pose', 'Osm ?', 'Beautiful..!!❤️?❤️', "Looking hot ??', 'Mast Zakas … Adaa.❤️'. असे लिहिले आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट, फायर आणि लव्हलीचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत्न ७२ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत.

याशिवाय प्रार्थना नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे हॉट फोटो शेअर करत असते. प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' मराठी मालिका आणि 'पवित्र रिश्ता' हिंदी मालिकेत दिसत आहे. तर तिने 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' यांसारख्या हिट चित्रपटात काम केले आहे. तिच्या इंन्स्टाग्रामवर २० लाखांहून अधिक फालोव्हर्स आहेत.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news