Ashwini Mahangade : केसांत गजरा, नाकात नथ अन्... नऊवारीत अश्विनीचा नखरा | पुढारी

Ashwini Mahangade : केसांत गजरा, नाकात नथ अन्... नऊवारीत अश्विनीचा नखरा

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते या मालिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) चाहत्याच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत अश्विनीने अनघा नावाची भूमिकेने चाहत्यांची मने जिकंली आहेत. तर अश्विनी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून मराठमोळा अंदाजातील फोटो शेअर करत असते. सध्या तिच्या मराठमोळा वारी लूकने चर्चेत आली आहे. या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

आई कुठे काय करते या मालिकेत अनघाची मुख्य भूमिका साकारुन अश्विनी ( Ashwini Mahangade) प्रकाशझोतात आली आहे. अश्विनी नेहमी सामाजिक कार्यात आणि सोशल मीडियावर सक्रिय असते. अश्विनी सध्या आळंदीच्या घाटावर टाईम्स स्पेन्ड करताना दिसली आहे. यावेळी तिने पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीसोबत लाल रंगाचे ब्लाऊज परिधान केले आहे. यासोबत तिने केसांत गजरा, नाकात नथ, पायात बूट, साजेशीर दागिने, मेकअप आणि लाल रंगाच्या डिझाईनमधील शालने तिच्या सौदर्याला चारचॉंद लावले आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘विठ्ठल नामाचा गजर आसमंतात घुमू लागला, टाळ मृदंगाच्या आवाजात वारकरी नाचू लागला, एकोपा जपणारी ही वारी आपल्या सगळ्यांना समृद्ध करू लागली, राम कृष्ण हरी…. असे म्हटले आहे. यावरून अश्विनीला विठठ्लाच्या दर्शनाची आस लगल्याचे दिसतेय. तर सध्या आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला गेली असून तेथील घाटावरून फोटो शेअर केला आहे. यावेळी आश्विनीने एका नदीच्या घाटावर स्वत: च्या पायावर हात ठेवून हटके पोझ दिली आहे. हा फोटो तिने तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

याशिवाय आश्निनीने अंगणातील तुळशी वृदांवनच्या शेजारी उभी असलेले काही फोटो सोळ मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत तिचा मराठमोळा लूक चाहत्याच्या पंसतीस उतरला आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो पाहायला मिळतात. या फोटोच्या कॅप्शनमध्ये काही चाहत्यांनी ‘❤️❤️❤️❤️sundar’, ‘Beautiful✨’ आणि ‘Nice’, अशा कॉमेन्टस केल्या आहेत.

हाही वाचलंत का? 

Back to top button