karthik aryan:कार्तिकला ‘त्या’ महिलेने लग्नासाठी दिली तब्बल २० कोटींची ऑफर | पुढारी

karthik aryan:कार्तिकला 'त्या' महिलेने लग्नासाठी दिली तब्बल २० कोटींची ऑफर

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा ( karthik aryan ) काही दिवसांपूर्वी त्याच्या एका छोट्या चाहतीसोबत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर मात्र, कार्तिकला लग्नासाठी प्रपोज करत २० कोटींची ऑफर मिळाली आहे. ही माहिती सोशल मीडियावर मिळाली आहे.

कार्तिक आर्यन बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक आहे. तो नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हटके आणि स्टायलिश फोटो शेअर करत असतो. कार्तिक आर्यनचा मोठा फॅन फॉलोइंग देखील आहे. गेल्या काही दिवसांत कार्तिकच्या एका छोट्या चाहती (इनायत वर्मा) सोबतचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत ‘अर्जुन पाठक’ या चित्रपटातील डायलॉग म्हणताना इनायत दिसत होती.

हा व्हिडिओ शेअर करताना कार्तिकने कॅप्शनमध्ये ‘क्यूटेस्ट अर्जुन पाठक’ असे लिहिले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांच्या पसंतीस उतरला. काही जणांनी कार्तिकचे कौतुक केले. तर काहींनी मुलगी इनायतच्या गोंडसपणाचे कौतुक केले.

याच दरम्यान कार्तिकच्या ( karthik aryan ) एका महिला फॅनने व्हिडिओला केलेल्या कॉमेन्टसने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात एका महिला फॅनने चक्क लग्नाची मागणी घालत २० कोटींची ऑफर दिली आहे. यासोबतच चाहत्याने हार्ट इमोजीदेखील शेअर केला आहे. यावरून फॅन्सना सुद्धा सेलेब्रिटीसोबत लग्न करण्याची क्रेझ असते हे लक्षात येते.

या कॉमेन्टसवर कार्तिकने रिटि्विट करत कधी बोलणी करायची? असे म्हटले आहे. कार्तिक आर्यन सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर कामात बिझी असून ही वेळात वेळ काढून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. कार्तिकच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. याशिवाय कार्तिकच्या घराखालीही चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

Back to top button