Wakad Crime: छेड काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; चौघांना अटक

बुलेटवरून आणि नंतर ऑटो रिक्षातून निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहाण; वाकड पोलिसांनी चार तासांत लावला छडा
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

वाकड: छेड काढल्याच्या रागातून एका तरुणाला बुलेट दुचाकी आणि त्यानंतर ऑटो रिक्षातून निर्जन ठिकाणी नेऊन बेदम मारहाण करत त्याचा खून करण्यात आला. वाकड येथील कावेरीनगर भाजी मंडईसमोरील मोकळ्या जागेतील कचरा टाकण्याच्या ठिकाणी शनिवार (दि. १९) रात्री साडेअकरापूर्वी ही घटना घडली. खुनानंतर आरोपी पसार झाले होते; मात्र, वाकड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे अवघ्या चार तासांत गुन्ह्याची उकल करून चौघांना अटक केली.

Crime News
Indrayani River Rejuvenation Project: इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाच्या जागेवरून महापालिकेचा पेच; ५७ हेक्टरपैकी केवळ १७ हेक्टर ताब्यात

मारुती बाळासाहेब बनसोडे (३७, रा. बौद्धनगर, दत्तनगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांचे मामा सुग्रीव लक्ष्मण गायकवाड (५४, रा. बोराडेवाडी, डी-मार्टसमोर, मोशी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमित दशरथ साळुंखे (२६, रा. जगतापनगर, थेरगाव), किशोर सुभाष वाघमारे (३९, रा. पवारनगर, थेरगाव), भारत संजय पवार (२३, रा. पवारनगर, थेरगाव) आणि किरण अंकुश उमाप (२८, रा. अण्णाभाऊ साठेनगर, वाकड) यांना अटक करण्यात आली आहे.

Crime News
Kusgaon Crime: पत्नीच्या डोक्यात दगड-विटांनी मारहाण; कुसगाव बुद्रुकमध्ये महिलेचा खून, पती लोणावळा रेल्वेस्थानकावर ताब्यात

वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित साळुंखे याच्या मानलेल्या बहिणीची मारुती बनसोडे यांनी छेड काढल्याचा राग त्याच्या मनात होता. या कारणावरून अमितने आपल्या साथीदारांसोबत संगनमत करून बनसोडे याला मारहाण करण्याचा कट रचला. त्यानुसार बनसोडे याला प्रथम बुलेटवरून आणि त्यानंतर ऑटो रिक्षामधून वाकड येथील कावेरीनगर भाजी मंडईसमोरील मोकळ्या जागेतील कचरा टाकण्याच्या ठिकाणी आणण्यात आले. तेथे आरोपींनी बनसोडे यांच्या डोक्यासह तोंड, गळा, हनुवटी तसेच शरीराच्या इतर भागांवर जबर मारहाण केली. या मारहाणीत बनसोडे गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. सुरुवातीला आरोपी आणि मृत व्यक्ती यांच्यातील संबंध तसेच खुनाचे नेमके कारण स्पष्ट नसल्याने पोलिसांसमोर आरोपींची ओळख पटविण्याचे आव्हान होते.

Crime News
Dehu Alandi Road Traffic: चार-पाच वर्षांपासून रखडलेली कमान; देहू-आळंदी रस्त्यावर वाहतूक कोंडीचा विळखा

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी तपास पथकाला आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. सहायक पोलिस निरीक्षक श्रीनिवास दराडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अमित साळुंखे, किशोर वाघमारे आणि भारत पवार यांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी तिघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून खून केल्याचे समोर आले. त्यानंतर फरार साथीदार किरण उमाप याचाही शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भोकरे करीत आहेत.

Crime News
PCMC Drainage Chamber: ड्रेनेज चेंबरच्या दुरुस्तीभोवती तुटलेल्या झाकणांचाच ‘धोका’; पिंपरी-चिंचवडमध्ये अपघाताची भीती

'या' पथकाने केली खुनाची उकल

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक श्रीनिवास दराडे, सहायक पोलिस निरीक्षक भोकरे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक मारणे, सहायक पोलिस फौजदार दळे, पोलिस हवालदार वंदू गिरे, सचिन गायकवाड, मोहम्मद नदाफ, विजय मोरे, हनुमंत कांबळे, विजय घाडगे, विजय भुसारे, पोलिस शिपाई समाधान कांबळे, कारभारी पालवे, विक्रम भगत, कौंतेय खराडे, ज्ञानदेव झेंडे, प्रमोद गायके, अभिषेक मांडे आणि मंगेश लोखंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news