Kusgaon Crime: पत्नीच्या डोक्यात दगड-विटांनी मारहाण; कुसगाव बुद्रुकमध्ये महिलेचा खून, पती लोणावळा रेल्वेस्थानकावर ताब्यात

घटनेनंतर कर्नाटकच्या दिशेने पसार होण्याचा प्रयत्न; तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

लोणावळा: मावळ तालुक्यातील कुसगाव बुद्रुक येथील कारके वस्तीमध्ये पत्नीच्या डोक्यात व शरीरावर दगड आणि विटांनी मारहाण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २१) घडली. या घटनेनंतर पसार झालेल्या पतीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे लोणावळा रेल्वेस्थानकावर ताब्यात घेतले.

Crime News
Dehu Alandi Road Traffic: चार-पाच वर्षांपासून रखडलेली कमान; देहू-आळंदी रस्त्यावर वाहतूक कोंडीचा विळखा

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान कारकेवस्ती, कुसगाव बुद्रुक येथे दगडू रामू वाघमारे (वय ४५) याने अज्ञात कारणावरून पत्नी काळी दगडू वाघमारे (वय ४०) यांच्या डोक्यात तसेच शरीरावर दगड व विटांनी मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.

Crime News
PCMC Drainage Chamber: ड्रेनेज चेंबरच्या दुरुस्तीभोवती तुटलेल्या झाकणांचाच ‘धोका’; पिंपरी-चिंचवडमध्ये अपघाताची भीती

तपासादरम्यान आरोपी कर्नाटक राज्याच्या दिशेने रेल्वेने पसार होण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री करुन पोलिसांनी लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात कारवाई करत दगडू रामू वाघमारे याला ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची

Crime News
PCMC Property Tax Arrears: थकबाकीदार मालमत्तांवर ३० सप्टेंबरनंतर जप्ती; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय

कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार आणि लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक नाथा केकाण, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे आदी सहभागी होते.

Crime News
AI Predictive Maintenance: मशीन बंद पडण्याआधीच ‘एआय’ देणार धोक्याची चाहूल; पिंपरी-चिंचवडच्या उद्योगविश्वात नवे तंत्रज्ञान

तीन स्वतंत्र तपास पथके केली होती तयार

घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, घटनेनंतर आरोपी दगडू वाघमारे पसार झाला होता. आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक भूषण माने आणि महिला सहायक पोलिस निरीक्षक विजया म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली होती. तपास पथकांनी तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर गोपनीय बातमीदारांकडूनही माहिती घेण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news