ST Awadel Tethe Pravas Scheme: ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेला पुणे-पिंपरीत उत्स्फूर्त प्रतिसाद

एसी व इलेक्ट्रिक बसचा समावेश; 5 महिन्यांत लाखोंचे उत्पन्न, प्रवाशांचा वाढता कल
ST
STPudhari
Published on
Updated on

हेमांगी सूर्यवंशी

पिंपरी: राज्य परिवहन महामंडळ (एसटी ) च्या आवडेल तेथे प्रवास या योजनेला पुणे-पिंपरी चिंचवड विभागातून उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत केलेल्या बदलानंतर अवघ्या पाच महिन्यांत ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या कालावधीत 4 लाख 24 हजार 252 रुपये उत्पन्न मिळाले आहे. या योजनेत आता वातानुकुलित तसेच इलेक्ट्रीक बसमधूनही प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या योजनेकडे प्रवाशांचा वाढता कल दिसत आहे.

ST
LPG Shortage Coal Price Hike: एलपीजी टंचाईमुळे कोळशाचे दर दुप्पट; पिंपरी-चिंचवडमध्ये व्यावसायिक अडचणीत

महामंडळाकडून प्रवाशांसाठी आवडेल तेथे प्रवास योजना सुरू केली आहे. यामध्ये चार आणि सात दिवसांचा पास काढून नागरिक राजाच्या कोणत्याही भागात एसटीतून फिरू शकतात. या योजनेमुळे प्रवाशांच्या पैशांची बचत होत आहे. या योजनेअंतर्गत प्रवास करताना काही अटी आणि नियमांमुळे प्रवाशांत नाराजी होती. या पास सुविधेअंतर्गत इलेक्ट्रिक तसेच वातानुकुलित गाड्यांतून प्रवास करता येत नव्हता.

ST
Pimpri Chinchwad MIDC Problems: पिंपरी-चिंचवड एमआयडीसीत सुविधा ठप्प; कर भरूनही उद्योजक त्रस्त

खासगी बसच्या तुलनेत एसटीचे भाडे परवडणारे असल्याने प्रवाशांची आर्थिक बचत होत आहे. वारंवार तिकीट काढण्याची गरज नसल्याने पर्यटन, धार्मिक तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना आधिक सोयीची ठरत आहे. सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवासासाठी अधिकाधिक प्रवाशांनी आवडेत तेथे या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

ST
Heatwave Precautions PCMC: उन्हाचा तडाखा वाढला; उष्माघात टाळण्यासाठी महापालिकेचे नागरिकांना आवाहन

पुन्हा वाढला योजनेकडे कल

एसटी महामंडळाने डिसेंबरमध्ये योजनेत सुधारणा करत चार आणि सात दिवसांचे पास उपलब्ध करुन देण्यात आले. या पासच्या माध्यमातून प्रवाशांना राज्यातील कोणत्याही भागात एसटीने अमर्याद प्रवास करता येतो. पूर्वी तिकीट दर वाढल्यामुळे पास महाग झाले होते आणि प्रतिसाद घटला होता. त्यानतंर केलेला दरकपात व इलेक्ट्रीक बसचा समावेश केल्यानंतर प्रवाशाचा कल पुन्हा या योजनेकडे वाढला

ST
PCMC Financial Crisis: महापालिकेवर 1,418 कोटींचा नवा आर्थिक बोजा; कर्ज-देणींचा विळखा अधिक घट्ट

बसस्थानकात मिळतो पास

प्रवाशांच्या सोईसाठी सवलतीचा पास हा दोन प्रकारात उपलब्ध आहे. यामध्ये चार आणि सात दिवस, मध्यरात्री बारापासून दुसऱ्या 11.59 मिनिट अशा कालावधीसाठी तो चालतो. ही योजना सात ऑक्टोबरपासून लागू करण्यात आलेली आहे. आवडेल तेथे प्रवास योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास कोणत्याही बसस्थानकातील पास खिडकीवर जाऊन पास काढवा लागतो. रक्कम भरल्यानंतर आपल्याला ओळखपत्र किंवा पास दिला जातो. ते दाखवून त्या काळात आवडेल तेथे प्रवास करता येतो.

नोकरीनिमित्त ये-जा करणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा अधिक फायदा होतो आहे. तसेच चार आणि सात दिवसांसाठी पर्यटन करणाऱ्या प्रवाशांसाठी आवडेल तेथे प्रवास योजना सोईची ठरत आहे.

पल्लवी पाटील, आगारप्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news