Heatwave Precautions PCMC: उन्हाचा तडाखा वाढला; उष्माघात टाळण्यासाठी महापालिकेचे नागरिकांना आवाहन

दुपारी बाहेर पडणे टाळा, पाणी नियमित प्या; आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना जाहीर
Mumbai Heatwave Alert
Mumbai Heatwave AlertPudhari
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात उन्हाचा तडाका वाढला आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. नागरिकांनी दुपारच्या वेळेच्या तीव्र उन्हात घराबाहेर पडू नये. गरज असल्यास टोपी, छत्री व गॉगलचा वापर करावा. सतत पाणी प्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Mumbai Heatwave Alert
PCMC Financial Crisis: महापालिकेवर 1,418 कोटींचा नवा आर्थिक बोजा; कर्ज-देणींचा विळखा अधिक घट्ट

उन्हात दारू, चहा, कॉफीचे सेवन टाळा

तीव्र उन्हात अतिकष्टाची कामे करू नका. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका. दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा. उच्च प्रथिनेयुक्त तसेच, शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच, मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी, असा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

Mumbai Heatwave Alert
Pune Metro Phase 3 Delay: पुणे मेट्रो तिसरा टप्पा रखडला; सर्व स्टेशन एकत्र सुरू करण्यावरून अडथळे

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. घराबाहेर पडताना गॉगल, छत्री अथवा टोपीचा वापर करा. सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.

Mumbai Heatwave Alert
Gudi Padwa Vehicle Sell: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहनखरेदीला उधाण; शहरात 10 हजारांहून अधिक नोंदी

गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे. शक्य त्या ठिकाणी पक्षी व प्राण्यांना योग्य त्या ठिकाणी पिण्याच्या पाणी ठेवण्यात यावे. नागरिकांसाठी पानपोईची व्यवस्था करावी. घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच, रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्यप्रकाशाचा संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे. पहाटेच्यावेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.

Mumbai Heatwave Alert
Unauthorized Construction PCMC: अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट; पत्राशेडचे शहरभर पेव

चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या!

अशक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास, तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास जठड, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा. पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news