Coal
CoalPudhari

LPG Shortage Coal Price Hike: एलपीजी टंचाईमुळे कोळशाचे दर दुप्पट; पिंपरी-चिंचवडमध्ये व्यावसायिक अडचणीत

25 रुपयांवरून 50 रुपये किलो दर; हॉटेल, बेकरी आणि लघुउद्योगांवर आर्थिक ताण
Published on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे कोळशाच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, त्याचा परिणाम दरवाढीच्या स्वरूपात दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी 25 रुपये प्रतिकिलो दराने मिळणारा कोळसा आता 50 रुपये प्रतिकिलो दराने विक्री केला जात आहे. त्यामुळे हॉटेल, ढाबे, बेकरी तसेच लहान व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

Coal
Pimpri Chinchwad MIDC Problems: पिंपरी-चिंचवड एमआयडीसीत सुविधा ठप्प; कर भरूनही उद्योजक त्रस्त

आखाती देशात सुरू असलेल्या यु्‌‍द्धामुळे गॅसपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे पर्यायी इंधन म्हणून कोळशाचा वापर वाढला आहे. मात्र, अचानक वाढलेल्या मागणीमुळे बाजारात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला असून, विक्रेत्यांनी दर वाढवले आहेत.

Coal
Heatwave Precautions PCMC: उन्हाचा तडाखा वाढला; उष्माघात टाळण्यासाठी महापालिकेचे नागरिकांना आवाहन

यामुळे सर्वसामान्य ग््रााहकांबरोबरच व्यावसायिक वर्गही त्रस्त झाला आहे. व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, गॅस उपलब्ध नसल्याने कोळशाचा वापर करणे भाग पडत आहे. मात्र, दर दुप्पट झाल्याने नफा कमी होत आहे.

Coal
PCMC Financial Crisis: महापालिकेवर 1,418 कोटींचा नवा आर्थिक बोजा; कर्ज-देणींचा विळखा अधिक घट्ट

काही ठिकाणी पदार्थांच्या किंमती वाढवण्याची वेळ येत आहे. दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाकडे गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. गॅसटंचाई कायम राहिल्यास कोळशाचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Coal
Pune Metro Phase 3 Delay: पुणे मेट्रो तिसरा टप्पा रखडला; सर्व स्टेशन एकत्र सुरू करण्यावरून अडथळे

आर्थिक व्यवहारांवर परिणाम

इंधनाच्या एका स्रोतावर अवलंबून राहण्याऐवजी पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे गरजेचे आहे. अन्यथा अशा परिस्थितीत बाजारातील अस्थिरता कायम राहू शकते. गॅसटंचाई आणि कोळशाच्या दरवाढीमुळे शहरातील आर्थिक व्यवहारांवर परिणाम होत असून, यावर लवकर उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news