

खराळवाडी : पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळांतर्गत सलग 1 ते 2 वर्षे काम केले. मंडळाकडून लेव्ही, पगार, पीएफ, दिवाळी बोनसचे सानुग््राह अनुदान या सर्व सुविधा दिल्या. मात्र, मंडळ तक्रारदाराच्या दबावाखाली बळी पडून सुरक्षारक्षकांची नोंदणी बोगस ठरवत अनुभव दाखला सानुग्रह बोगस ठरवत सुरक्षारक्षकांच्या नोकरीवर मंडळ गदा आणू पाहात आहे.
पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ पिंपरी चिंचवड, पुणे शहरातील इमारती, सोसायट्या, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, सरकारी निमसरकारी कार्यालये येथील आस्थापनांमध्ये सुरक्षारक्षक पुरवठा करण्याचे काम करते. सुरक्षारक्षक मंडळाच्या गलथान कारभारामुळे हे पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ पिळवणुकीचे शिकार ठरत असल्याचे भयावह चित्र दिसत आहे.
सुरक्षारक्षक हवे आहेत, अशा आस्थापना निविदा जाहीर करतात. त्या आस्थापना त्यातील पात्र कंत्राटदाराला कंत्राट देते. ते सुरक्षारक्षक मंडळ आस्थापनांमध्ये कामगार पुरवतात. त्या बदल्यात आस्थापना कंत्राटदाराला पेमेंटचा पुरवठा करतात. त्यातून मंडळ सुरक्षारक्षकांना पगार देतात. यात त्याचा फायदा गृहीत धरलेला असतो.
आस्थापनांकडून जास्तीची रक्कम; पण कमी अशिक्षित, गरीब, कामाची गरज असल्याने आवाज कोण उठवणार सोळा-सोळा तास काम करूनही मोबदला तुटपुंजाच. कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा आहे. त्यानुसार आठवड्यातून एक सुटी, 20 दिवसांना 1 रजा मिळायला हवी. सार्वजनिक सुट्या पगारी हव्यात. मंडळाने कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा केलाच पाहिजे. नोकरीसाठी आवश्यक ते साहित्य मंडळाने दिले पाहिजे.
कंत्राटी कामगार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षारक्षक बोर्ड आहे. कामगार प्रतिनिधी, मालक प्रतिनिधी आणि शासनाचा प्रतिनिधी त्याचे सदस्य असतात. उपायुक्त दर्जाचा अधिकारी याचा अध्यक्ष असतो. पुणे बोर्डात सध्या अध्यक्ष हेच एकमेव सदस्य आहेत. अन्य सदस्य नाहीत.
सुरक्षारक्षकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन बोर्ड कंत्राटदार किंवा त्याने ज्यांना कामगार पुरवले आहेत, त्यांना विचारणा करू शकते. त्यांच्यावर कारवाईची शिफारस कामगार कार्यालयाकडे करता येते.
मी मंडळात शैक्षणिक दाखला, मार्क लिस्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड व नोटीसला उत्तर दिले आहे. मला आक्टोबर महिन्यात मिळालेल्या या नोटीसमुळे नोकरीची भीती वाटत आहे.
एक सुरक्षारक्षक कामगार
दिलेल्या नोटीसची माहिती घेऊन, सुरक्षारक्षक कामगारांवर नोकरीची कोणत्याही प्रकारची गदा येणार नाही. नोटीसची माहिती घेऊन मंडळाकडून योग्य दखल घेतली जाईल. सुरक्षारक्षक कामगारांवर अन्याय होणार नाही.
प्रशांत वंजारी, सचिव, पुणे जिल्हा सुरक्षारक्षक