Election Rickshaw Campaign: निवडणुकांच्या तोंडावर रिक्षाचालकांना सुगीचे दिवस; प्रचार पोस्टरांसाठी रिक्षांची वाढती मागणी

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिक्षांवर राजकीय पोस्टर लावण्यासाठी चढाओढ; चांगल्या मानधनामुळे रिक्षाचालकांना दुहेरी फायदा
Election Rickshaw Campaign
Election Rickshaw CampaignPudhari
Published on
Updated on

नवी सांगवी : आगामी महापालिका निवडणुका जवळ आल्याने शहरात राजकीय घडामोडी वेग घेत आहेत. उमेदवारांची धावपळ, बैठका, मेळावे आणि जनसंपर्क यात्रांमुळे शहरातील वाहतुकीची दैनंदिन गतीही वाढली आहे. या वाढलेल्या हालचालींचा मोठा फायदा सध्या रिक्षाचालकांना होत असून, पोस्टर व अन्य प्रचार साहित्य वाहतुकीसाठी रिक्षांची मागणी वाढल्याने सध्या रिक्षा व्यवसायात ‌‘सुगीचे दिवस‌’ सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Election Rickshaw Campaign
Pimpri Traffic Jam: जुन्या महामार्गावर कोंडीचा विस्फोट; मेट्रो कामे आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीचा ठप्प कोलमडलेला ताळेबंद

रिक्षा हे सतत शहरभर फिरणारे वाहन असल्याने प्रचारासाठी अत्यंत प्रभावी माध्यम मानले जाते. या ‌‘मोबाइल होर्डिंग‌’ माध्यमाची किंमत इच्छुक उमेदवारांना चांगलीच कळलेली असल्यामुळे रिक्षांवर पोस्टर लावण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः चढाओढ सुरू झाली आहे. काही ठिकाणी तर पोस्टर लावण्यासाठी रिक्षाचालकांनाच आगाऊ मानधन देण्याची ऑफर देण्यात येत असल्याची चर्चा आहे.

Election Rickshaw Campaign
Red Zone Map PCMC: रेड झोनचा नकाशा प्रसिद्ध न केल्याने नागरिकांत संभ्रम

रिक्षांचे प्रमुख चौक, बसथांबे, रेल्वे स्टेशन परिसर किंवा कॉलेज परिसरात वारंवार फिरतात, त्या रिक्षांना सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीबरोबर ही बाब रिक्षाचालकांसाठी दुहेरी फायदा देणारी ठरत आहे. दरम्यान आगामी काळात मनपा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर होताच त्यांचा प्रचार आणखी जोमाने सुरू होणार आहे. त्यामुळे रिक्षांवर प्रचारविषयक पोस्टर लावण्याची ही स्पर्धा अजून वाढण्याचे संकेत आहेत.

Election Rickshaw Campaign
Police Raid: लॉज आणि मसाज सेंटरवर छापे हिंजवडी-चाकणमधून पाच महिलांची सुटका

रिक्षावर पोस्टर लावण्यासाठी चढाओढ

शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी सतत फिरणाऱ्या रिक्षा हे प्रचारासाठी सर्वात प्रभावी माध्यम ठरत असल्याने कमी खर्चात गल्लोगल्लीच्या नागरिकांपर्यंत पोहचण्याचा पर्याय म्हणून रिक्षांवर प्रचार पोस्टर लावण्यासाठी भावी उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः चढाओढ सुरू झाली आहे. अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रिक्षाचालकांना पोस्टर लावण्यासाठी विनंती करताना दिसत आहेत.

Election Rickshaw Campaign
Pimple Gurav Sweeping Machine: स्वीपिंग मशीनच उडवतेय धूळ! पिंपळे गुरवमध्ये स्वच्छतेऐवजी त्रास

पोस्टर लावायचे तरी कोणाचे?

रिक्षाचालकांसमोर पेच निर्माण झाला आहे. अनेक उमेदवार, पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते हे बहुतेक रिक्षाचालकांचे परिचित असल्याने, कोणाच्या पोस्टरला प्राधान्य द्यावे हा प्रश्न सध्या रिक्षाचालकांना सतावत आहे. काही रिक्षाचालकांचे म्हणणे आहे की, एका पक्षाचे पोस्टर लावलं की दुसरा नाराज होतो. दोघेही ओळखीचे असतील तर अजूनच अडचण होते. दरम्यान काही रिक्षाचालकांनी या पेचातून मार्ग काढण्यासाठी ‌‘पहले आओ, पहले पाओ‌’ ही पद्धत अवलंबण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी राजकीय वाद टाळण्यासाठी थेट आम्ही राजकीय पोस्टर लावत नाही, असे सांगण्याचा पर्याय निवडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news